Post Office च्या ‘या’ योजनांमध्ये गुंतवणूक करून मिळवा प्राप्तीकराचा लाभ, जाणून घ्या याबाबत

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  Post Office | प्रत्येक काम करणार्‍या व्यक्तीसाठी बचत करणे खूप महत्वाचे आहे. मग तो पगारदार व्यक्ती असो किंवा असंघटित क्षेत्रात काम करणारी व्यक्ती. प्रत्येकाने आपले भविष्य आणि काही तातडीच्या गरजा पूर्ण करण्यासाठी बचत करणे आवश्यक आहे. जर तुम्ही तुमची बचत वेगवेगळ्या गुंतवणूक योजनांमध्ये (Post Office) गुंतवली तर तुम्ही याद्वारे चांगली रक्कम देखील जमा करू शकता.

जर तुम्हाला तुमचे बचतीचे पैसे गुंतवायचे असतील आणि त्याच वेळी तुम्हाला तुमच्या गुंतवणुकीवर प्राप्तीकर सूटचा लाभ मिळवायचा असेल तर तुम्ही इंडिया पोस्टच्या अनेक बचत योजनांमध्ये गुंतवणूक करून तुम्ही प्राप्तीकर कायद्याच्या कलम 80 सी अंतर्गत प्राप्तीकरातील सवलतीचा लाभ मिळवू शकता. पोस्ट ऑफिसच्या योजनांमध्ये गुंतवणूक करून तुम्ही योग्य उत्पन्नातून एका आर्थिक वर्षात 1.5 लाख रुपयांपर्यंतच्या कपातीचा दावा करू शकता.

पोस्ट ऑफिस टाइम डिपॉझिट स्कीम

या योजनेत एका ठराविक कालावधीसाठी एकरकमी पैसे जमा करू शकता. गॅरंटी रिटर्न आणि व्याज पेमेंटची पसंतीची सुविधा मिळते. 1 वर्ष, 2 वर्ष, 3 वर्षाच्या मॅच्युरिटी कालवधीच्या जमा रक्कमेवर 5.5 टक्केच्या दराने व्याज मिळते.

पाच वर्षाच्या खात्यावर 6.7 टक्के रिटर्न मिळते. हे प्राप्तीकर कायदा 1961 च्या कलम 80 सी अंतर्गत लाभासाठी सूट मिळवण्यास पात्र आहे. योजनेत व्याज वार्षिक देय आहे परंतु याची गणना तिमाही हिशेबाने होते.

सार्वजनिक भविष्य निधी योजना

Post Office Public Provident Fund (PPF) एक रिटायर्मेंट प्लानिंगवर फोकस करणारे इंस्ट्रूमेंट आहे. सोबतच हे खाते टॅक्स स्थितीच्या ’सूट, सूट, सूट’ (EEE) श्रेणी अंतर्गत येते, ज्याचा अर्थ आहे की रिटर्न, मॅच्युरिटी रक्कम आणि व्याज उत्पन्नात प्राप्तीकरातून सूट मिळेल. योजनेत दरवर्षी 7.1 टक्के व्याज मिळते, जे वार्षिक प्रकार मिश्रित असते.

 

ज्येष्ठ नागरिक बचत योजना

ज्येष्ठ नागरिक बचत योजना (SCSS) एका गुंतवणूक अव्हेन्यूप्रमाणे काम करते आणि निवृत्तीनंतर चांगले जीवन जगण्यासाठी पैसे जमा करण्यास मदत करते. 60 वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त वयाचा व्यक्ती या योजनेत गुंतवणूक करू शकतो. यामध्ये दरवर्षी 7.4 टक्के व्याज मिळते.

राष्ट्रीय बचत पत्र

राष्ट्रीय बचत पत्र किंवा NSC मध्ये दरवर्षी 6.8 टक्केच्या दराने व्याज मिळते. हे व्याज वार्षिक मॅच्युअर होते परंतु मॅच्युरिटीवर दे असते. राष्ट्रीय बचत प्रमाणपत्रात जमा पैसे प्राप्तीकर कायद्याच्या कलम 80 सी अंतर्गत कपातीसाठी पात्र आहे.

 

Web Title : post office | savings invest in these post office schemes and get income tax benefits

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Army Recruitment Scam | …म्हणून त्याची मूळ शैक्षणिक व अन्य कागदपत्रे घेतली ताब्यात; लष्कर भरती पेपर फुटीप्रकरणातील आरोपींचा प्रताप

Pune News | 6 कोटींचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप ! पारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरे यांच्याविरुद्ध लोकायुक्तांकडे तक्रार दाखल

Pune Crime | वर्षभरापासून फरार असलेल्या सराईत गुन्हेगाराला अटक; गुन्हे शाखेकडून पिस्तुलासह काडतुस जप्त