नवी दिल्ली : वृत्त संस्था – Post Office Scheme | तुम्हाला तुमच्या गुंतवणुकीवर गॅरेंटेड रिटर्नसह कमी जोखीम हवी असेल तर तुम्ही इंडिया पोस्टच्या मंथली इन्कम स्कीमचा (MIS) लाभ घेऊ शकता. ही एक कमी जोखमीची गुंतवणूक योजना आहे, ज्यामध्ये तुम्हाला दरमहिना व्याजाची कमाई होत राहते. (Post Office Scheme)
ज्यांना एकदा गुंतवणूक केल्यानंतर नियमित प्रकारे उत्पन्नाची आवश्यकता असते, अशा व्यक्तींसाठी पोस्टाची ही योजना आहे. या योजनेविषयी सविस्तर माहिती जाणून घेवूयात. (Post Office Scheme)
कोण उघडू शकतात खाते
केवळ भारतीय रहिवाशीच मासिक उत्पन्न योजनेत खाते उघडू शकतात. आपल्या जवळच्या पोस्टात आवश्यक कागदपत्रे जमा करून कुणीही प्रौढ व्यक्ती पोस्टात एमआयएस खाते उघडू शकतो. 10 वर्षापेक्षा जास्त वयाचे अल्पवयीन आपल्या नावाने हे खाते उघडू शकतात, परंतु कागदपत्रे म्हणून त्यास आपल्या पालकांची कागदपत्रे सुद्धा द्यावी लागतील.
गुंतवणुकीची रक्कम
कुणीही व्यक्ती पोस्टाच्या या योजनेत 100 रुपयांच्या पटीत गुंतवणूक करू शकतो. एक व्यक्ती या योजनेत कमाल 4.5 लाख रुपयांची गुंतवणूक करू शकतो. संयुक्त गुंतवणूक केल्यास योजनेत नऊ लाख गुंतवू शकता. जॉईंट होल्डर असल्याने दोघांना समान भागीदारी मिळते.
किती मिळते व्याज
पोस्ट ऑफिसच्या योजनेत वार्षिक 6.6 टक्के व्याज मिळते.
खाते उघडल्यानंतर एक महिन्याने व्याज मिळण्यास सुरुवात होते, आणि जोपर्यंत खाते मॅच्युअर होत नाही तोपर्यंत व्याज मिळत राहते.
दर तुम्ही दर महिना मिळणार्या व्याजावर क्लेम केला नाही तर, त्या व्याजाच्या रक्कमेवर कोणताही अतिरिक्त व्याजाचा लाभ मिळत नाही. (Post Office Scheme)
Web Title : interest is available every month in the monthly income scheme of the post office know the benefits of this government scheme
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
Narayan Rane | ‘देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे केंद्रीय मंत्री झालो’ – नारायण राणे