Post Office Scheme | पोस्टाच्या ‘या’ 7 योजनांमध्ये करा गुंतवणूक, काही वर्षातच पैसे होतील दुप्पट; जाणून घ्या
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Post Office Scheme | पोस्टाच्या योजनांमध्ये गुंतवणुक सुरक्षित आणि विश्वासार्ह समजली जाते. तुम्हाला पोस्टाच्या योजनांबाबत जाणून घ्यायचे असेल आणि गुंतवणूक करून चांगला नफा कमवायचा असेल तर पैसे डबल करणार्या या योजनांबाबत (Post Office Scheme) जाणून घेवूयात.
1. पोस्ट ऑफिस टाइम डिपॉझिट (Post Office Time Deposit)
या योजनेत एका ठराविक कालावधीसाठी एकरकमी पैसे जमा करू शकता. गॅरंटी रिटर्न आणि व्याज पेमेंटची पसंतीची सुविधा मिळते. 1 वर्ष, 2 वर्ष, 3 वर्षाच्या मॅच्युरिटी कालवधीच्या जमा रक्कमेवर 5.5 टक्केच्या दराने व्याज मिळते. पाच वर्षाच्या खात्यावर 6.7 टक्के रिटर्न मिळते.
2. पोस्ट बचत बँक खाते (Post Office Savings Bank Account)
या सेव्हिंग अकाऊंटवर 4 टक्के दराने वार्षिक व्याज मिळते. 10,000 रुपयांपर्यंत व्याज पूर्णपणे टॅक्स फ्री असते. या खात्यात केवळ 500 रुपये मिनिमम बॅलन्स ठेवावा लागतो. पोस्ट ऑफिसमध्ये एटीएम आणि चेक बुकची सुविधा सुद्धा मिळते. बचत खाते चालू स्थितीत ठेवण्यासाठी 3 आर्थिक वर्षात किमान 1 व्यवहार जरूरी आहे.
3. पोस्ट आवर्ती ठेव (Post Office Recurring Deposit)
RD स्कीमवर सध्या 5.8 टक्के व्याज दिले जात आहे. केंद्र सरकार प्रत्येक तिमाहीला आपल्या सर्व स्मॉल सेव्हिंग स्कीम्समध्ये (small saving schemes) व्याजाची घोषणा करते. जर तुम्ही दर महिन्याला पोस्ट ऑफिसच्या आरडी स्कीममध्ये 10 हजार रुपयांची गुंतवणूक 10 वर्षासाठी केली तर ते मॅच्युरिटीवर 16,26,476 लाख रुपये मिळतील.
(Post Office Scheme)
4. पोस्ट मासिक उत्पन्न योजना (Post Office Monthly Income Scheme)
पोस्ट ऑफिस मंथली इन्कम स्कीमवर 6.6 टक्के व्याजदर मिळतो. याचा अर्थ आहे की, त्या व्यक्तीस वार्षिक 29,700 रुपयांचा लाभ होईल. मात्र, जॉईंट खाते उघडणे आणि 9 लाख रुपयांची इन्व्हेस्टमेंट केल्यानंतर हे रिटर्न दुप्पट होऊन 59,400 रुपये होईल. जर आपण हे 12 महिन्यात विभागले तर प्रत्येक महिन्याला रिटर्नम्हणून 4,950 रुपये मिळू शकतात.
–
ज्येष्ठ नागरिक बचत योजना (SCSS) एका गुंतवणूक अव्हेन्यूप्रमाणे काम करते आणि निवृत्तीनंतर चांगले जीवन जगण्यासाठी पैसे जमा करण्यास मदत करते. 60 वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त वयाचा व्यक्ती या योजनेत गुंतवणूक करू शकतो. यामध्ये दरवर्षी 7.4 टक्के व्याज मिळते.
5. पोस्ट पीपीएफ (Post Office PPF)
Post Office Public Provident Fund (PPF) एक रिटायर्मेंट प्लानिंगवर फोकस करणारे इंस्ट्रूमेंट आहे. सोबतच हे खाते टॅक्स स्थितीच्या ’सूट, सूट, सूट’ (EEE) श्रेणी अंतर्गत येते, ज्याचा अर्थ आहे की रिटर्न, मॅच्युरिटी रक्कम आणि व्याज उत्पन्नात प्राप्तीकरातून सूट मिळेल. योजनेत दरवर्षी 7.1 टक्के व्याज मिळते, जे वार्षिक प्रकार मिश्रित असते.
6. पोस्ट सुकन्या समृद्धी योजना (Post Office Sukanya Samriddhi Account)
या योजनेत सध्या 7.6 टक्के दराने व्याज दिले जात आहे. यावर इन्कम टॅक्स सूट सुद्धा मिळते.
जर तुम्ही दरमहिना 3000 रुपये गुंतवले म्हणजे वार्षिक 36000 रुपये तर 14 वर्षानंतर 7.6 टक्के वार्षिक कंपाऊंडिंगच्या हिशेबाने तुम्हाला 9,11,574 रुपये मिळतील. 21 वर्ष म्हणजे मॅच्युरिटीवर ही रक्कम सुमारे 15,22,221 रुपये होते.
7. पोस्ट राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र (Post Office National Saving Certificate)
राष्ट्रीय बचत पत्र किंवा NSC मध्ये दरवर्षी 6.8 टक्केच्या दराने व्याज मिळते.
हे व्याज वार्षिक मॅच्युअर होते परंतु मॅच्युरिटीवर दे असते.
राष्ट्रीय बचत प्रमाणपत्रात जमा पैसे प्राप्तीकर कायद्याच्या कलम 80 सी अंतर्गत कपातीसाठी पात्र आहे. (Post Office Scheme)
Web Title :- Post Office Scheme | invest in these post office schemes money will be double in a few years know details
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
Maharashtra Band | ‘बेस्ट’ आणि ‘एसटी’ महामंडळाच्या बसचा बंदमध्ये सहभाग, वाहतुकीवर होणार थेट परिणाम
Coronavirus in Maharashtra | राज्यात गेल्या 24 तासात 1,823 जण ‘कोरोना’मुक्त, जाणून घ्या इतर आकडेवारी