Post Office च्या ‘या’ स्कीममध्ये जमा करा केवळ 95 रुपये आणि मिळतील 14 लाख, जाणून घ्या कसे?

नवी दिल्ली : वृत्त संस्था – Post Office | तुम्हाला सुद्धा छोट्या कमाईद्वारे मोठी रक्कम बनवायची असेल तर पोस्ट ऑफिस तुम्हाला एक खास संधी देत आहे. या स्कीममध्ये रोज 95 रुपये लावून तुम्ही 14 लाख रुपये कमावू शकता. पोस्ट ऑफिस ग्राहकांसाठी विविध स्कीम (post office scheme) आणते, ज्यामध्ये तुम्ही कमी वेळात मोठा फंड बनवू शकता. या स्कीमचे नाव आहे पोस्ट ऑफिस स्कीम ग्राम सुमंगल ग्रामीण डाक जीवन विमा (Gram Sumangal Rural Postal Life Insurance). ही पॉलिसी त्या लोकांसाठी खुप लाभदायक आहे, ज्यांना वेळोवेळी पैशांची आवश्यकता असते. या स्कीमबाबत जाणून घेवूयात…

Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram, facebook page and Twitter for every update

जाणून घ्या कसा आहे पोस्ट ऑफिसचा प्लॅन ?

Post Office चा हा एंडोमेंट प्लॅन आहे, यामध्ये तुम्हाला मनी बॅकसह मॅच्युरिटीवर एकरकमी पैसे दिले जातात. रूरल पोस्टल लाईफ इंश्युरन्स स्कीमची सुरुवात भारत सरकारने 1995 मध्ये केली होती. या अंतर्गत ग्राम सुमंगल स्कीम सुद्धा येते. या अंतर्गत पाच आणखी विमा स्कीम ऑफर करण्यात आल्या आहेत.

ग्राम सुमंगल स्कीम 15 आणि 20 वर्षासाठी आहे. यामध्ये मॅच्युरिटीपूर्वी तीन वेळा मनी बॅक मिळते. ग्राम सुमंगल योजना कमाल 10 लाख रुपयांची रक्कम देते. जर कुणी व्यक्ती पॉलिसीच्या मॅच्युरिटीनंतर सुद्धा जिवंत असेल तर त्याला सुद्धा पैसे परत मिळण्याचा लाभ मिळतो. एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूच्या प्रकरणात विमा रक्कमेसह बोनस रक्कम सुद्धा दिली जाते.

कुणाला मिळतो याचा लाभ?

1 या स्कीमचा लाभ कुणीही भारतीय नागरिक घेऊ शकतो.

2 या पॉलिसीसाठी किमान वय मर्यादा 19 वर्ष आहे. तर, कमाल 45 वयापर्यंत कुणीही व्यक्ती पॉलिसी खरेदी करू शकतो.

3 पॉलिसी 15 वर्ष किंवा 20 वर्षासाठी घेतली जाऊ शकते.

4 20 वर्षासाठी पॉलिसी घेण्याची कमाल वयोमर्यादा 40 वर्ष आहे.

5 यामध्ये कमाल 20 लाख रुपयांपर्यंत सम अश्योर्ड मिळते.

कसे मिळतील 14 लाख रुपये?

समजा एखाद्या 25 वर्षाच्या व्यक्तीने 7 वर्षांच्या सम अश्योर्डसह एक पॉलिसी खरेदी केली. तर त्याचा वार्षिक प्रीमियम 32,735 रुपये येईल. सहामाही प्रीमियम 16,715 रुपये आणि तिमाही प्रीमियम 8449 रुपये येईल. अशाप्रकारे व्यक्तीला दर महिना 2853 रुपये द्यावे लागतील. म्हणजे सुमारे 95 रुपये दरदिवशी प्रीमियम म्हणून द्यावे लागतील. ही पॉलिसी 20 वर्षासाठी असेल. तुम्हाला 8व्या, 12व्या आणि 16व्या वर्षी 20-20 टक्केच्या हिशेबाने 1.4-1.4 लाख रुपये मनी बॅक म्हणून दिले जातील. यानंतर 20 वर्ष पूर्ण होतात.

या स्कीममध्ये प्रति हजार दरवर्षी 48 रुपये बोनस मिळतो. 7 लाख रुपये सम अश्योर्डचा बोनस एक वर्षात 33,600 रुपये झाला. 20 वर्षासाठी ही रक्कम 6.72 लाख रुपये झाली. 20व्या वर्षी तुम्हाला उर्वरित 2.8 लाख रुपये सुद्धा मिळतील. सर्व पैशांची बेरीज केली तर 20 वर्षात तुम्हाला एकुण 19.72 लाख रुपये मिळतात.

Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram, facebook page and Twitter for every update

Web Title : post office scheme invest only 95 rupees daily and earn 14 lakh rupees know about it

 

मुंबई : 12 तासानंतर विहिरीतून काढण्यात आली ‘ती’ गाडी, असे केले रेस्क्यू; पहा व्हिडीओ

Petrol Price Today | पेट्रोल-डिझेलच्या किमती पुन्हा वाढल्या, जाणून घ्या मुंबई-पुण्यासह इतर प्रमुख शहरांतील 1 लीटरचे दर

कोरोनाच्या डेल्टा व्हेरिएंटने घेतले नवीन धोकादायक रूप, अँटीबॉडी कॉकटेलला सुद्धा निष्प्रभ करू शकतो डेल्टा+

फुफ्फुसांची होतेय समस्या ! कोरोनातून बरे झालेले रूग्ण पुन्हा हॉस्पिटलमध्ये होताहेत दाखल, डॉक्टरांची वाढली चिंता

14 जून राशीफळ : आज पुष्ययोग, ‘या’ 7 राशींना होणार धनलाभ, इतरांसाठी असा आहे सोमवार