आता ‘एवढ्या’ महिन्यात 50 हजाराचे होणार 1 लाख रूपये, जाणून घ्या पोस्ट ऑफिसच्या स्कीमबद्दल

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – शेतकरी विकास पत्रमध्ये गुंतवणूक केल्याने तुम्हाला चांगला फायदा होऊ शकतो. केव्हीपीमध्ये केलेली गुंतवणून नऊ वर्ष पाच महिन्यांनी दुप्पट परत मिळणार आहे. नरेंद्र मोदी सरकारने तीन महिन्यांच्या केव्हीपीचा व्याज दर कमी करून 7.6 % इतका केला आहे. त्यामुळे लवकर जवळच्या पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन तुम्ही याबाबतची अधिक माहिती घेऊ शकता.

एवढ्या महिन्यात होणार पैसे दुप्पट –
शेतकरी विकास पत्र (KVP) मध्ये जमा असलेली रक्कम आता नऊ वर्ष आणि पाच महिन्यात दुपट्ट होणार आहे. यासाठी केंद्र सरकार प्रत्येक तिन महिन्यासाठी व्याज दर निश्चित करत असते.

काय आहे नेमकं शेतकरी विकास पत्र –
हे एक प्रकारचे प्रमाणपत्र आहे जे तुम्ही पोस्ट ऑफिसमधून खरेदी करू शकता. याला एखाद्या बॉण्ड स्वरूपात केले गेले आहे. आणि यावर सरकार व्याज देत असते.

किती पैसे भरावे लागतात –
या मध्ये पैसे भरण्यासाठी कोणतीही मर्यादा ठेवलेली नाही परतून कमीम कमी एक हजार रुपये एवढी रक्कम भरावी लागणार आहे आणि यामध्ये तुम्ही एक, दोन, तीन हजार अशा सरळ क्रमाने पैसे भरू शकता मात्र 1500, 2500 अशा पद्दतीने भरू शकत नाहीत.

कोठे मिळू शकते KVP –
पोस्ट ऑफिसच्या कोणत्याही शाखेमधून तुम्ही हे मिळवू शकता. आपल्या मुलांसाठी देखील तुम्ही याची खरेदी करू शकता तसेच दोन व्यक्तींच्या भागीदारीत देखील तुम्ही खरेदी करू शकता. दोन पासपोर्ट साईज फोटो, ओळख पत्र, आणि 50 हजारापेक्षा जास्त गुंतवणूक असेल तर पॅन कार्ड आवश्यक आहे.

कधी काढू शकता रक्कम –
गुंतवणूक केलेली रक्कम आपल्याला मिळण्यासाठी कमीत कमी 113 महिन्यांची प्रतीक्षा करावी लागणार आहे. मात्र आर्थिक सल्लागार यामध्ये जास्त दिवस गुंतवणूक करण्याचा सल्ला देतात.

हा होणार फायदा –
यामध्ये गुंतवणूक करणाऱ्यांना आर्थिक फायदा तर मिळतोच शिवाय एका व्यक्तीच्या नावावरून दुसऱ्या व्यक्तीच्या नावावर देखील ही गुंतवणूक पाठवता येते. एवढेच नाही तर एका पोस्ट ऑफिस मधून दुसऱ्या पोस्ट ऑफिसमध्ये ही सुविधा स्थलांतरित केली जाऊ शकते. तसेच देशातील काही बँकांमधून सुद्धा याची खरेदी केली जाऊ शकते.

टॅक्समध्ये मिळते सूट –
KVP मुळे तुम्हाला टॅक्समध्ये सुद्धा सूट मिळते यामधून मिळणाऱ्या पैशांवर कोणताही टॅक्स भरावा लागत नाही. तसेच या योजनेमध्ये आरोग्यकरावर देखील सूट मिळते. आयकर विभागाच्या 80 क नुसार तुम्ही यामध्ये सूट मिळवण्यासाठी प्राप्त ठरत नाही.

Visit : policenama.com

बाळाला फ्रूट ज्यूस देणे टाळा, जाणून घ्या कारणे
वाढत्या वजनावर कसे ठेवावे नियंत्रण ? आहार आणि व्यायामाबाबत जाणून घ्या
दाढ दुखत असल्यास करा ‘हा’ घरगुती उपाय, अशी घ्या काळजी
चॉकलेट खा… आणि हृदय ठेवा तंदुरुस्त, जाणून घ्या काय आहे यामध्ये
तुपापेक्षा तेल आहे घातक ! जाणून घ्या कारणे
अन्नाची चव वाढविणाऱ्या या मीठाचे आहेत अनेक फायदे, जाणून घ्या
शरीरयष्टी खुपच किरकोळ आहे का ? मग वजन वाढविण्यासाठी करा ‘हे’ ८ उपाय
महिलांना दम्याचा आजार होण्याची शक्यता अधिक, जाणून घ्या कारण
‘डायबेटिस’ चा झोप आणि आहाराशी निकटचा संबंध, अशी घ्या काळजी