Post Office Scheme | रोज 50 रुपये जमा करून एकदाच मिळवा 35 लाख, स्कीमबाबत जाणून घ्या सविस्तर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Post Office Scheme | भारतीय पोस्ट ऑफिस अनेक प्रकारच्या बचत योजना (Post Office Scheme) चालवते. पोस्ट ऑफिसच्या योजनांमध्ये गुंतवणूक करून करोडो लोकांना चांगला रिटर्न मिळत आहे. त्यामुळे लोक पोस्ट ऑफिस स्कीममध्ये पैसे गुंतवतात. पोस्ट ऑफिसमध्ये पैसे गुंतवणे जोखीममुक्त मानले जाते.

 

लोकांना त्यांचे पैसे सुरक्षित आणि उत्तम रिटर्न असलेल्या योजनांमध्ये गुंतवायचे आहेत. अशीच एक पोस्ट ऑफिस योजना म्हणजे ग्राम सुरक्षा योजना (Gram Suraksha Yojana). या योजनेसाठी तुम्ही दररोज फक्त 50 रुपयांची बचत करून 35 लाख रुपयांचा रिटर्न मिळवू शकता.

 

कोण करू शकतात गुंतवणूक ?

ग्राम सुरक्षा योजना ग्रामीण पोस्टल जीवन विमा योजना कार्यक्रमाचा (Rural Postal Life Insurance Schemes Program) एक भाग आहे. ही विमा पॉलिसी 1995 मध्ये देशातील ग्रामीण लोकांसाठी सुरू करण्यात आली होती. 19 वर्षे ते 55 वर्षे वयोगटातील व्यक्ती ग्राम सुरक्षा योजनेत गुंतवणूक करू शकतात. (Post Office Scheme)

या योजनेत 10,000 ते 10 लाख रुपयांची गुंतवणूक करता येते. प्रीमियम भरण्यासाठी अनेक पर्याय उपलब्ध आहेत. तुम्ही मासिक, त्रैमासिक, सहामाही आणि वार्षिक आधारावर प्रीमियम भरू शकता.

 

अशी होईल कमाई

ग्राम सुरक्षा योजनेबाबत दिलेल्या माहितीनुसार, जर एखाद्या व्यक्तीने या योजनेत दर महिन्याला 1,515 रुपये म्हणजेच दररोज केवळ 50 रुपये गुंतवले तर त्याला 35 लाख रुपयांपर्यंतचा रिटर्न मिळू शकतो.

तुम्ही वयाच्या 19 व्या वर्षी ग्राम सुरक्षा योजना खरेदी केल्यास, 55 वर्षापर्यंत तुम्हाला 1,515 रुपये प्रीमियम भरावा लागेल.

 

असे मिळतील 35 लाख

जर तुम्ही वयाच्या 58 व्या वर्षापर्यंत ही योजना घेतली तर तुम्हाला दरमहा 1463 रुपये आणि 60 वर्षांपर्यंत तुम्हाला दरमहा 1411 रुपये द्यावे लागतील.
तुमचा प्रीमियम चुकल्यास, तुम्ही तो 30 दिवसांच्या आत जमा करू शकता.

जर तुम्ही या योजनेच्या रिटर्नवर नजर टाकली तर, गुंतवणूकदाराला 55 वर्षांच्या गुंतवणुकीवर 31.60 लाख रुपये,
58 वर्षांच्या गुंतवणुकीवर 33.40 लाख रुपये आणि 60 वर्षांच्या गुंतवणुकीवर 34.60 लाख रुपयांचा मॅच्युरिटी लाभ मिळेल.

 

काय आहे विशेष ?

ग्राम सुरक्षा योजनेंतर्गत वयाची 80 वर्षे पूर्ण झाल्यावर ही रक्कम दिली जाते.
जर त्या व्यक्तीचा मृत्यू झाला असेल तर ही रक्कम त्या व्यक्तीच्या कायदेशीर वारसाकडे जाते.
ग्राम सुरक्षा योजना खरेदी केल्यानंतर 3 वर्षांनी ग्राहक ती सरेंडर करू शकतो. मात्र, अशा परिस्थितीत त्याला कोणताही फायदा मिळत नाही.

पॉलिसीचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे इंडिया पोस्टने ऑफर केलेला बोनस आहे आणि अंतिम घोषित बोनस प्रत्येक 1,000 रुपयांवर वार्षिक 60 रुपये आहे.

 

Web Title :- Post Office Scheme | post office gram suraksha yojana per day invest 50 rupees and get 35 lakhs

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा