Post Office Scheme | फायद्याची गोष्ट ! 1500 रुपये दरमहा जमा केल्यास मिळतील 35 लाख रुपये; जाणून घ्या सर्वकाही

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Post Office Scheme | बाजारात गुंतवणुकीचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. यापैकी अनेक योजनांवर सांगितलेला रिटर्न खुपच आकर्षक सुद्धा असतो. मात्र, यापैकी काहींमध्ये जोखीमचा सुद्धा समावेश असतो. अनेकजण कमी रिटर्नची सुरक्षित योजना निवडतात कारण त्यामध्ये जोखीम कमी असते. तुम्ही सुद्धा कमी जोखीमीचा रिटर्न किंवा गुंवणूक पर्याय (Post Office Scheme) शोधत असाल तर पोस्टची योजना तुमच्या उपयोगी पडू शकते.

 

भारतीय पोस्टाद्वारे (Indian Post) देण्यात येणारी ही ग्राम सुरक्षा योजना (Gram Suraksha Yojana) एक असा पर्याय आहे जिच्यात कमी जोखीम आणि चांगला रिटर्न मिळवू शकता. ग्राम सुरक्षा योजनेत बोनससह ठराविक कालावधीत रक्कम किंवा 80 वर्षाच्या वयात मिळणे किंवा मृत्यूच्या स्थितीत कायदेशीर वारस व्यक्तीला, जे अगोदर होईल ते मिळते. (Post Office Scheme)

 

नियम आणि अटी –
19 ते 55 वर्ष वयोगटातील कुणीही भारतीय नागरिक ही विमा योजना घेऊ शकतो. किमान विमा रक्कम 10,000 रुपयांपासून 10 लाख रुपयांपर्यंत गुंतवणुक करू शकता. प्रीमियम पेमेंट मासिक, त्रैमासिक, अर्ध-वार्षिक किंवा वार्षिक करू शकता.

 

प्रीमियमचे पेमेंट करण्यासाठी 30 दिवसांची सूट आहे. पॉलिसी कालावधीत प्रीमियम न भरल्यास बंद पडल्याच्या स्थितीत ग्राहक पॉलिसी पुन्हा सुरू करण्यासाठी प्रलंबित प्रीमियमचे पेमेंट करू शकतो.

 

कर्ज मिळते –
ही विमा योजना कर्ज सुविधेसोबत येते, ज्याचा लाभ पॉलिसीधारकाला चार वर्षानंतर मिळतो.

 

सरेंडर करू शकता पॉलिसी –
ग्राहक 3 वर्षानंतर पॉलिसी सरेंडर करू शकतो. मात्र, अशावेळी कोणताही लाभ मिळणार नाही. पॉलिसीचे सर्वात मोठे आकर्षण इंडिया पोस्टद्वारे दिला जाणारा बोनस आणि अंतिम घोषित बोनस प्रति वर्ष 65 रुपये प्रति 1,000 रुपये आहे.

मॅच्युरिटी बेनेफिट –
जर कुणी 19 वर्षाच्या वयात 10 लाखाची ग्राम सुरक्षा पॉलिसी खरेदी केली तर 55 वर्षासाठी मासिक प्रीमियम 1,515 रुपये, 58 वर्षासाठी 1,463 रुपये आणि 60 वर्षासाठी 1,411 रुपये असेल. पॉलिसी खरेदाराला 55 वर्षासाठी 31.60 लाख रुपये, 58 वर्षासाठी 33.40 लाख रुपयांचा मॅच्युरिटी बेनिफिट मिळेल. 60 वर्षासाठी मॅच्युरिटी बेनिफिट 34.60 लाख रुपये होईल.

 

येथे मिळेल सर्व माहिती –
नामांकित व्यक्तीचे नाव किंवा इतर माहिती जसे ईमेल आयडी आणि मोबाइल नंबरमध्ये कोणत्याही अपडेच्या बाबतीत,
ग्राहक जवळच्या पोस्ट कार्यालयात जाऊ शकतो. इतर प्रश्नांसाठी,
ग्राहक दिलेली टोल-फ्री हेल्पलाईन 1800 180 5232/155232 किंवा अधिकृत वेबसाइट www.postallifeinsurance.gov.in वर संपर्क करू शकतो.

 

Web Title :- Post Office Scheme | post office scheme 1500 rupees monthly deposit and get 35 lakh rupees know how

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pimpri Corona | दिलासादायक ! पिंपरी चिंचवडमध्ये ‘कोरोना’च्या 88 रुग्णांना डिस्चार्ज, जाणून घ्या इतर आकडेवारी

Pune Navale Bridge Accident | पुण्यातील नवले पुलाजवळ अपघातांची मालिका सुरुच ! 11 दिवसात 5 अपघात, 7 जणांचा मृत्यू

Pune Crime | विवाहितेवर पतीकडून अत्याचार ! सासऱ्याने देखील एकांताचा फायदा घेत केलं ‘हे’ कृत्य