Post Office Scheme | पोस्ट ऑफिसच्या ‘या’ योजनेत लावा 10 हजार रुपये! लवकर व्हाल लखपती, जाणून घ्या सविस्तर
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Post Office Scheme | जर तुम्हाला रातोरात लखपती व्हायचे असेल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. कोणत्याही गुंतवणुकीत रिस्क फॅक्टर असतोच. कमी रिस्कमध्ये चांगल्या रिटर्नसाठी तुम्ही पोस्ट ऑफिसच्या योजनेत गुंतवणुक करू शकता. शेयर मार्केटमध्ये रिस्क जास्त आहे तर रिटर्नसुद्धा अन्य इन्व्हेस्टमेंट प्रॉडक्टपेक्षा जास्त आहे. परंतु रिस्क घेण्याची क्षमता सर्वांमध्ये नसते.
(Post Office Scheme)
पोस्ट ऑफिसच्या छोट्या बचत योजना सर्वात चांगला पर्याय असू शकतात. यामध्ये रिस्क फॅक्टर सुद्धा कमी आहे आणि सोबतच रिटर्न सुद्धा चांगला मिळतो. एक अशी गुंतवणूक ज्यामध्ये रिस्क खुप कमी आणि रिटर्न सुद्धा चांगला मिळतो, असा पर्याय जाणून घेऊयात. पोस्ट ऑफिस रिकरिंग डिपॉझिट (Post Office Recurring Deposit) यापैकी एक मार्ग आहे.
कशी सुरू करावी पोस्ट ऑफिस आरडीमध्ये गुंतवणूक
पोस्ट ऑफिस (Post Office) च्या रिकरिंग डिपॉजिट योजनेत चांगला रिटर्न मिळतो. शिवाय कमी पैशात सुद्धा गुंतवणुक करू शकता. पैसे सुद्धा सुरक्षित राहतात. यामध्ये 100 रुपये महिना गुंतवणुक करू शकता. जास्तीत जास्त कोणतेही लिमिट नाही, तुम्ही कितीही गुंतवणूक करू शकता. (Post Office Scheme)
पोस्ट ऑफिसमध्ये जे RD अकाऊंट ओपन होते ते 5 वर्षासाठी असते. यापेक्षा कमी कालावधीसाठी हे खाते नाही. दर तिमाही (वार्षिक रेटने) जमा रक्कमेवर व्याजाचे कॅलक्युलेशन केले जाते.
जाणून घ्या किती मिळेल व्याज
इंडिया पोस्ट ऑफिसच्या (India Post Office) वेबसाईटनुसार, RD स्कीमवर सध्या 5.8 टक्के व्याज दिले जात आहे. केंद्र सरकार प्रत्येक तिमाहीला आपल्या सर्व स्मॉल सेव्हिंग स्कीम्समध्ये (Small Saving Schemes) व्याजाची घोषणा करते.
दर महिन्याला 10 हजार टाकले तर मिळतील 16 लाख
जर दर महिन्याला पोस्ट ऑफिसच्या आरडी स्कीममध्ये 10 हजार रुपयांची गुंतवणूक 10 वर्षासाठी केली तर ते मॅच्युरिटीवर 16,26,476 लाख रुपये मिळतील.
दरमहिना गुंतवणूक – 10,000 रुपये
व्याज – 5.8%
मॅच्युरिटी – 10 वर्ष
10 वर्षानंतर मॅच्युरिटी अमाऊंट = 16,28,963 रुपये
—
आरडी खात्याबद्दल महत्त्वाच्या गोष्टी
जर तुम्ही वेळेवर आरडीचा हप्ता भरला नाही तर तुम्हाला दंड भरावा लागेल. हप्त्याला उशीर झाल्यास दरमहिना एक टक्का दंड भरावा लागेल. सोबतच जर तुम्ही लागोपाठ 4 हप्ते भरले नाही तर अकाऊंट बंद होईल.
पोस्ट ऑफिस RD वर कर
रिकरिंग डिपॉझिटमध्ये गुंतवणुक केल्यानंतर TDS कापला जातो, जर डिपॉझिट 40,000 रुपयांपेक्षा जास्त असेल तर 10 टक्के वार्षिक दराने टॅक्स लागतो.
RD वर मिळणार्या व्याजावर सुद्धा टॅक्स लागतो.
परंतु, पूर्ण मॅच्युरिटी अमांऊटवर टॅक्स लागत नाही. ज्या गुंतवणुकदारांचे कोणतेही टॅक्सेबल इन्कम नाही ते फॉर्म 15G भरून TDS वर सूट मिळवू शकतात, जसे की FD मध्ये होते.
पोस्ट ऑफिसशिवाय सरकारी आणि खासगी बँकासुद्धा रिकरिंग डिपॉझिटची सुविधा देतात…
बँकांच्या आवर्ती ठेवी
बँक RD चा दर कालावधी
Yes Bank 7.00% 12 महिने ते 33 महिने
HDFC Bank 5.50% 90/120 महिने
Axis Bank 5.50% 5 वर्ष ते 10 वर्ष
SBI Bank 5.40% 5 वर्ष ते 10 वर्ष
Web Title :- Post Office Scheme | post office scheme invest 10 thousand in post office recurring deposit and get 16 lakh rupees here is details
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update