मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Post Office Scheme | अनेकजण आपल्या भविष्यासाठी गुंतवणुकीचा (Investment) पर्याय निवडत असतात. त्यावेळी चांगला परतावा आणि सुरक्षित गुंतवणूक (Post Office Scheme) जिथे असेल त्याकडे अधिक लोक वळत असतात. दरम्यान असाच एक पर्याय भारतीय पोस्ट ऑफिस (Indian Post Office) देत आहे. पोस्टाकडून अनेक योजना निघत असतात. जर तुम्ही पोस्ट ऑफिस आरडी स्कीममध्ये (Recurring Deposit) दहा वर्षांसाठी दरमहा 10 हजार रुपये गुंतवले तर 10 वर्षांनंतर तुम्हाला 5.8 टक्के दराने 16 लाखांपेक्षा अधिक रुपये मिळू शकतात.
इक्विटी मार्केटमध्ये मोठा परतावा मिळू शकतो. पण, जोखीम अधिक असल्याने अनेक गुंतवणूकदार (Investors) त्याकडे पाठ दाखवतात. अशा परिस्थितीमध्ये, जर तुम्हाला सुरक्षित गुंतवणूक हवी असेल जिथे चांगला परतावा देखील मिळेल, तर पोस्ट ऑफिसच्या योजना तुमच्यासाठी चांगला पर्याय आहे. तसेच, पोस्ट ऑफिसच्या छोट्या बचत योजना तुमच्यासाठी सर्वोत्तम पर्याय असू शकतात. यात रिस्क फॅक्टरही कमी आहे आणि त्याचवेळी रिटर्नही (Returns) चांगला मिळतो. पोस्ट ऑफिस आरडी Recurring Deposit हाही एक गुंतवणुकीचा मार्ग आहे. (Post Office Scheme)
—
आरडीमध्ये अशी सुरू करा गुंतवणूक –
पोस्ट ऑफिस Recurring Deposit खाते ही गुंतवणूकीसाठी चांगली योजना आहे. या गुंतवणुकीत सरकारी सुरक्षेची हमी असते. यात तुम्ही केवळ 100 रुपयांच्या छोट्या रकमेसह गुंतवणूक सुरू करू शकता. गुंतवणुकीची कमाल मर्यादा नाही, तुम्ही त्यामध्ये हवे तेवढे पैसे टाकू शकता. या योजनेचे खाते 5 वर्षांसाठी सुरु केले जाते. बँका 6 महिने, 1 वर्ष, 2 वर्षे, 3 वर्षांसाठी आवर्ती ठेव खात्यांची सुविधा देतात. त्यात जमा केलेल्या पैशावर प्रत्येक तिमाहीत (वार्षिक दराने) व्याज मोजले जाते आणि प्रत्येक तिमाहीच्या शेवटी ते तुमच्या खात्यात (चक्रवाढ व्याजासह) जमा होतेय.
व्याज कसा मिळेल ?
आवर्ती ठेव योजनेवर 5.8 टक्के व्याज उपलब्ध आहे, हा नवीन दर 1 एप्रिल 2020 पासून लागू होईल.
भारत सरकार प्रत्येक तिमाहीत आपल्या सर्व लहान बचत योजनांचे व्याजदर निश्चित करते.
दरम्यान, तुम्हाला खात्यामध्ये नियमित पैसे जमा करत राहावे लागेल, जर तुम्ही पैसे जमा केले नाहीत तर तुम्हाला दरमहा 1 टक्का दंड भरावा लागणार आहे.
4 हप्ते चुकल्यानंतर तुमचे खाते बंद केले जातेय.
त्याचबरोबर RD मधील गुंतवणुकीवर TDS कापला जातो, जर ठेव रु. 40 हजार पेक्षा अधिक असेल तर 10 टक्के प्रतिवर्ष किंमतीने कर आकारला जातो.
Recurring Deposit (RD) वर मिळालेले व्याजही करपात्र आहे, परंतु संपूर्ण मॅच्युरिटी रकमेवर कर आकारला जात नाही.
ज्या गुंतवणूकदारांना कोणतेही करपात्र उत्पन्न नाही ते FD प्रमाणेच फॉर्म 15 G भरून TDS सूटचा दावा करू शकतात.
Web Title :- Post Office Scheme | post office scheme invest 10 thousand in the post office recurring deposit and get 16 lakh rupees see detail
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update