Post Office Scheme | ‘ही’ सरकारी स्कीम 120 महिन्यात बनवू शकते 24 लाखाचा मालक, जाणून घ्या किती करावी लागेल मासिक गुंतवणूक

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Post Office Scheme | इंडियन पोस्ट ऑफिसमध्ये गुंतवणुकीच्या अनेक योजना आहेत. ज्यामध्ये तुम्ही मासिक आणि वार्षिक आधारावर पैसे गुंतवून चांगला रिटर्न मिळवू शकता. सोबतच पोस्ट ऑफिसमध्ये बँक आणि इतर संस्थापेक्षा जास्त व्याज मिळते. यासोबतच येथे केलेली गुंतवणूक सुरक्षित सुद्धा असते. यासाठी अनेक लोक पोस्ट ऑफिसमध्ये गुंतवणे पसंत करतात. (Post Office Scheme)

 

आज आम्ही पोस्ट ऑफिसच्या रिकरिंग डिपॉझिट स्कीम (RD) बाबत सांगणार आहोत. ज्यामध्ये तुम्ही मासिक आधारावर 5 वर्षापर्यंत गुंतवणूक करू शकता आणि मॅच्युअर झाल्यानंतर गरज पडल्यास पुढे 5 वर्षासाठी वाढवू सुद्धा शकता.

 

पोस्ट ऑफिसमध्ये कसे उघडू शकता आरडी अकाऊंट –
पोस्ट ऑफिसमध्ये स्मॉल सेव्हिंगसाठी आरडी खाते 100 रुपयांच्या किमान गुंतवणुकीवर उघडता येते. हे खाते 10-10 रुपयांच्या मल्टीपलमध्ये पुढे डिपॉझिट करू शकता. यामध्ये कमाल गुंतवणुकीची मर्यादा नाही.

 

120 महिन्यात 24 लाखाचा होईल फंड –
पोस्ट ऑफिसमध्ये आरडीवर सध्या 5.8 टक्के वार्षिक व्याज मिळते. ज्यामध्ये व्याजाचे कम्पाउंडिंग तिमाही आधारावर केले जाते. जर दर महिना 15 हजार रुपये डिपॉझिट केले आणि 5 वर्षानंतर हे खाते पुन्हा 5 वर्षासाठी एक्सटेंड केले तर 120 महिन्यानंतर म्हणजे मॅच्युरिटीवर 24 लाख 39 हजार 714 रुपये मिळतील. तर 120 महिन्यात तुम्ही गुंतवलेली एकुण रक्कम 18 लाख रुपये होईल. ज्यावर तुम्हाला 6,39,714 रुपयांचे व्याज मिळेल. पोस्ट ऑफिसमध्ये आरडी खाते 5 वर्षासाठी पुढे वाढवण्यासाठी फॉर्म-4 सबमिट करावा लागतो.

गजर पडल्यास अगोदर सुद्धा बंद करू शकता खाते –
जर तुम्ही 5 वर्षासाठी आरडी खाते उघडले आणि काही कारणामुळे ते बंद करायचे असेल
तर ते 3 वर्षानंतर बंद करू शकता. (Post Office Scheme)

 

आरडी अकाऊंटवर मिळणारे फायदे –
पोस्ट ऑफिसमध्ये एक व्यक्ती कमाल 3 लोकांसोबत जॉईंट आरडी खाते उघडू शकतो.
तर मायनरसाठी गार्डियन अकाऊंट उघडू शकतात.
खात्यात 12 हप्ते जमा केल्यानंतर खात्यात जमा रक्कमेच्या 50 टक्केपर्यंत कर्ज मिळू शकते.
कर्जाची परतफेड एकरकमी किंवा हप्त्यात करता येते. कर्जाचा व्याजदर आरडीवर मिळणार्‍या व्याजापेक्षा 2 टक्के जास्त असतो.

 

Web Title :- Post Office Scheme | post office scheme make owner of 24 lakhs in 120 months know more in marathi

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Ashish Deshmukh | ‘हिवाळी अधिवेशन नागपूरला न होणे निंदनीय’, काँग्रेस नेत्याचा महाविकास आघाडीला घरचा आहेर

Kundlik Khande | ‘पोलीस उपाधीक्षकांनी शिवसेनेला बदनाम करण्याची सुपारी घेतली’, शिवसेना नेत्याचा गंभीर आरोप

अर्ध्या किंमतीत येथे मिळेल जबरदस्त मायलेजची Maruti WagonR, कंपनी देईल गॅरंटी आणि वॉरंटी प्लान