Post Office Scheme | पोस्ट ऑफिसची सुरक्षित योजना ! बँकेपेक्षाही देते जास्त परतावा, जाणून घ्या
पोलीसनामा ऑनलाइन टीम – Post Office Scheme | देशातील बहुतांश लोक पैसे गुंतवण्याचा विचार करत असतात. तसेच लोक अनेक योग्य पर्याय देखील शोधत असतात. अशा लोकांसाठी योग्य पर्याय म्हणजे पोस्ट ऑफिसची (Post Office scheme) फिक्स्ड डिपॉजिट/टर्म डिपॉझिट (Fixed Deposit / Term Deposit) योजना आहे. तर ही योजना लोकांसाठी सुरक्षित अशी योजना आहे. त्यामुळे अधिक लोकांचे प्राधान्य या योजनेकडे असते. विशेष म्हणजे, पोस्ट ऑफिसमध्ये गुंतवलेले तुमचे पैसे नेहमीच सुरक्षित असतात आणि रिटर्नची हमीही देतात. त्यामुळे या योजनेविषयी सविस्तर जाणून घ्या.
1 ते 5 वर्षांपर्यंत मुदत ठेव –
लहान बचत योजना (Small Savings Scheme) म्हणून गुंतवणूकदार पोस्ट ऑफिसमध्ये 1 ते 5 वर्षांपर्यंत मुदत ठेव (Term Deposit) खाते सुरू करू शकते. जानेवारी ते मार्च 2022 या तिमाहीत त्यांच्या व्याजदरात कोणताही बदल केलेला नाही. म्हणजेच जे व्याज ऑक्टोबर-डिसेंबर 2021 च्या तिमाहीत उपलब्ध होते, ते आताही मिळत राहणार आहे. (Post Office Scheme)
दरम्यान, मुदत ठेवींमध्ये, 6.7 टक्के व्याज पाच वर्षांसाठी देत आहेत. म्हणजे जर एखाद्या व्यक्तीने पाच वर्षांच्या मुदतीच्या ठेवीत (Term Deposit) 1 लाख रुपये जमा करून खाते सुरू केले, तर 5 वर्षानंतर, त्याला TD च्या व्याज दरानुसार 1,39,407 रुपये मिळतील. त्याच वेळी, 1 वर्ष, 2 वर्ष आणि 3 वर्षांच्या मुदत ठेवींवरील व्याज दर वार्षिक 5.5 टक्के इतका असणार आहे.
खाते कोण उघडू शकते?
या योजनेत कोणताही भारतीय स्वतः किंवा संयुक्त खाते (Joint Account) सुरू करू शकतो. तसेच, ज्यांचे वय 10 वर्षांपेक्षा अधिक असावे. एखादा मानसिकदृष्ट्या कमकुवत व्यक्ती देखील हे खाते सुरू करू शकतो. खाते उघडण्यासाठी तुम्ही त्यात 1 हजार रुपयांपासून कोणतीही रक्कम टाकू शकता. तेसच, पोस्ट ऑफिस (Post Office Scheme) मुदत ठेव मध्ये (Term Deposit) पाच वर्षाच्या गुंतवणुकीवर आयकर कायद्याच्या कलम 80C अंतर्गत कर सूट मिळणार आहे.
मुदत ठेव (टीडी) मधील सुविधा –
– यावर तुम्हाला नामांकन सेवा (Nomination Service) मिळणार आहे.
– पोस्ट ऑफिसमधून दुसऱ्या खात्यात खाते हस्तांतरित (Transfer) करण्याची सुविधा मिळू शकते.
– पोस्ट ऑफिस एक, पण एकापेक्षा जास्त टीडी (Term Deposit) खाते सुरू करू शकता.
– सिंगल अकाऊंटला जॉइंट किंवा जॉइंट अकाऊंटचे सिंगल अकाऊंट करता येईल
– खाते विस्तार (Account Extension) सुविधा.
– इंट्रा-ऑपरेबल नेटबँकिंग/मोबाइल बँकिंगद्वारे ऑनलाइन खाते उघडण्याची सुविधा आहे.
Web Title :- Post Office Scheme | the post office term deposit scheme is best for investing know in details
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update