मोदी सरकारकडून पोस्ट ऑफिसमधील नवीन ‘फिक्स डिपॉजिट’ स्कीमच्या घोषणा, जाणून घ्या संपूर्ण माहिती
नवी दिल्ली : वृत्त संस्था – जर तुम्ही पोस्ट ऑफिसच्या योजनेत पैसे गुंतवत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खुपच महत्वपूर्ण आहे. कारण सरकाने National Savings Time Deposit (TD) Scheme, 2019 चे नोटिफिकेशन जारी केले आहे. जर तुम्ही या योजनेत 1 लाख रूपये जमा करत असाल तर त्यावर एक वर्षाच्या खात्यावर वर्षाला 7,081 रूपये व्याज मिळणार आहे. तसेच अशापद्धतीने दुसर्या आणि तिसर्या वर्षी सुद्धा खात्यावर असेच व्याज मिळेल. परंतु, 5 वर्षाच्या खात्यावर 7,925 रूपये व्याज मिळेल. तर पाच वर्षानंतर या खात्यावर तुमचा फायदा 39625 रूपये होईल. परंतु, हे लक्षात ठेवा मुदतपूर्व पैसे काढण्याच्या स्थितीत 5 वर्षांच्या मुदत ठेव खात्यावर तीन वर्षांच्या खात्याच्या व्याज दाराच्या हिशेबाने व्याजाची आकारणा केली जाईल.
अशी आहे…नॅशनल सेव्हिंग्स टाइम डिपॉजिट स्कीम 2019
1 किती वर्ष मुदतीचे खाते
या योजनेत चार प्रकारची बचत मुदत ठेव खाती (फिक्सड डिपॉजिट) उघडता येतील. यामध्य 1, 2, 3 आणि 5 वर्षांच्या मुदतीची खाती आहेत. या खात्यांमध्ये वरील वर्षांसाठी पैसे जमा करता येतील.
2 कोण उघडू शकते
सरकारकडून जारी करण्यात आलेल्या नोटिफिकेशननुसार या योजनेत कोणीही वयस्क व्यक्ती खाते उघडू शकतो. तसेच सामायिक खातेही उघडू शकतात. तसेच 10 वर्षांचा अल्पवयीन अथवा मानसिकदृष्ट्या कमजोर हे अन्य व्यक्तीद्वारे खाते उघडू शकतात.
3 किती पैसे गुंतवता येतील
खातेधारकास कमीत कमी 1000 रूपये जमा करावे लागतील. तर कमाल रकमेची मर्यादा नाही. 100 रूपयांच्या पटीत तुम्ही कितीही रक्कम भरू शकता.
4 व्याज किती टक्के
एक वर्ष, दो वर्ष, तीन वर्षांच्या मुदतीच्या खात्यावर वार्षिक 6.9 टक्के व्याज मिळणार आहे. तर 5 वर्षांच्या मुदत ठेव खात्यावर वार्षिक 7.7 टक्के व्याज मिळणार आहे.
* या खात्यावर जमा केलेल्या रक्कमेवर व्याजाची आकारणी तिमाही पद्धतीने होणार आहे. हे व्याज ज्या तारखेला खाते उघडले त्या वर्षाच्या शेवटी होणार आहे.
* या योजनेनुसार खातेधारक व्याजाची रक्कम आपल्या बचत खात्यातून मिळवू शकतो. जर ग्राहकांने जमा केलेल्या रक्कमेवरील व्याज काढले नाही तर त्यावर कोणतेही व्याज दिले जाणार नाही.
5 खाते मध्येच बंद केले तर, हस्तांतरीत केले तर…
जर तुम्ही पाच वर्षे मुदत ठेवीचे खाते डिपॉजिटच्या तारखेच्या चार वर्षानंतर बंद केले तर तीन वर्ष मुदतीच्या खात्यानुसार व्याजाची आकारणी केली जाईल. मॅच्युरिटीनंतर हे खाते बंद करावे लागते.
मुदत ठेव योजना जर तुम्हाला अन्य व्यक्तीस हस्तांतरीत करायची असेल तर तुम्हाला सुरक्षा म्हणून फॉर्म-5 मध्ये अर्ज करावा लागेल. यासह ज्या व्यक्तीला आपन खाते हस्तांतरीत करत आहोत, त्याचे पत्रही जरूरी असणार आहे.
6 व्याजाच्या उत्पन्नावर कर भरायचा का?
पोस्ट ऑफिसच्या छोट्या बचत योजनांवर कर आकारणीचा कोणताही नियम नाही. परंतु, याचा अर्थ असा नाही की यावर कमावलेले व्याज करमुक्त आहे. व्याजातून मिळालेली रक्कम त्याच्या वार्षिक उत्पन्नामध्ये जोडली जाऊन त्यावर स्लॅबनुसार कर भरावा लागणार आहे. जर तुम्ही मोठ्या स्लॅब अंतर्गत येत असाल तर कर भरल्यानंतर यावर व्याजदर खुप कमी होतो. जर तुम्ही पाच वर्षांच्या योजनेत पैसे गुंतवत असाल तर त्यावर उत्पन्न कर कायद्याप्रमाणो कलम 80 सी नुसार करात सवलत प्राप्त करू शकता.
फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/
- ‘या’ ५ वनस्पती जवळपास ठेवल्या तर डास जातील पळून !
- ‘या’ ७ उपायांनी मासिक पाळीच्या वेदना होतील दूर !
- ‘सोशल मीडिया’वर सतत ‘अॅक्टिव्ह’ राहण्याचे ‘हे’ आहेत ३ दुष्परिणाम
- उपाशीपोटी ‘हे’ ७ पदार्थ चुकूनही खाऊ नका, जाणून घ्या परिणाम
- ‘या’ ७ कारणांमुळे पोटावर झोपणे आरोग्यासाठी घातक !
- ‘हे’ आहेत चॉकलेटचे ८ आरोग्यदायी फायदे ! जाणून घ्या
- सकाळी चालायला जाता, मग ‘ब्रिस्कवॉक’ घ्या, ‘या’ ५ गोष्टी लक्षात ठेवा
- मुळ्याचे ‘हे’ १५ आरोग्यवर्धक फायदे माहिती आहेत का ? जाणून घ्या
- पायावर उभे राहूनही काम करायला शिका, ‘हे’ आहेत ४ फायदे
- ‘हे’ तेल हृदयासाठी ‘टॉनिक’, 9 प्रकारच्या आजारांपासून ठेवतं दूर, जाणून घ्या
- उत्तम आरोग्यासाठी ‘हे’ ४ पदार्थ नियमित खा, जाणून घ्या कोणते