Post Office Schemes 2023 | ‘या’ बचत योजनांमध्ये मिळतेय जबरदस्त व्याज, मुलांपासून ज्येष्ठ नागरिकांना फायदा

नवी दिल्ली : Post Office Schemes 2023 | श्रीमंत होण्याचे प्रत्येकाचे स्वप्न असते आणि त्यासाठी बचतीसह गुंतवणूक (Investment) करणे हा सर्वात प्रभावी मार्ग आहे. शेअर बाजारात (Stock Market) गेल्या काही महिन्यांत चढ-उतार दिसून आला आहे, परंतु बचत योजनांवरील व्याजदरात लक्षणीय वाढ झाली आहे. या योजनांमध्ये कर लाभ मिळत असल्याने त्या गुंतवणूकदारांसाठी एक चांगला गुंतवणूक पर्याय म्हणून समोर आल्या आहेत. पोस्ट ऑफिसच्या पाच लहान बचत योजनांबद्दल (Post Office Schemes 2023) आपण आज जाणून घेऊ, ज्याद्वारे तुम्ही मोठी बचत करू शकता आणि तुमचे आणि मुलांचे भविष्य सुधारू शकता.

पीपीएफ Public Provident Fund (PPF)

पब्लिक प्रॉव्हिडंट फंड (PPF) ही एक लोकप्रिय बचत योजना आहे. तिचा मॅच्युरिटी पीरियड १५ वर्षे आहे हा कालावधी पूर्ण झाल्यानंतर तो पाच वर्षांसाठी वाढविता येऊ शकतो. याचा फायदा घेण्यासाठी वार्षिक किमान ५०० रुपये गुंतवावे लागतील. या योजनेत १,५०,००० रुपयांपर्यंतची गुंतवणूक प्राप्तीकराच्या कलम ८०सी च्या कक्षेत येते. सध्या सरकारकडून पीपीएफवर ७.१ टक्के व्याज दिले जात आहे.

नॅशनल सेव्हिंग मंथली इन्कम स्कीम

तुम्ही मासिक उत्पन्नाचा पर्याय शोधत असाल तर National Saving Monthly Income Scheme तुमच्यासाठी जास्त फायद्याची ठरू शकते. सध्या राष्ट्रीय बचत मासिक उत्पन्न योजनेवर ७.४ टक्के व्याज दिले जात आहे. यामध्ये एक खाते उघडल्यावर जास्तीत जास्त ९ लाख रुपये आणि संयुक्त खाते उघडण्यासाठी जास्तीत जास्त १५ लाख रुपयांची गुंतवणूक करता येते. त्याचा मॅच्युरिटी पीरियड पाच वर्षांचा आहे. (Post Office Schemes 2023)

महिला सन्मान सेव्हिंग सर्टिफिकेट Mahila Samman Savings Certificate (MSSC)

महिला सन्मान सेव्हिंग सर्टिफिकेट ही सर्वात नवीन बचत योजना आहे. ती विशेषत: महिलांसाठी सरकारने सुरू केली आहे. या योजनेत तुम्ही किमान हजार रुपयांचे खाते उघडू शकता, तर एका आर्थिक वर्षातील गुंतवणुकीची कमाल मर्यादा दोन लाख रुपये निश्चित करण्यात आली आहे. यामध्ये गुंतवणूकदारांना ७.५ टक्के व्याज दिले जाते. यावर करात सूटही मिळते.

सुकन्या समृद्धी योजना Sukanya Samriddhi Yojana (SSY)

मुलींच्या उत्तम संगोपनासाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे.
यामध्ये किमान २५० रुपये आणि कमाल १.५ लाख रुपयांची गुंतवणूक करता येते.
सध्या एसएसवायवर ८ टक्के व्याज दिले जात आहे.
यामध्ये प्राप्तीकराच्या कलम ८०सी अंतर्गत कर सवलतीचा लाभही मिळतो.

नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट National Savings Certificate (NSC)

नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट ही पोस्ट ऑफिसच्या लोकप्रिय बचत योजनांपैकी एक आहे.
यावर ७.७ टक्के व्याज दिले जात आहे. यामध्ये किमान एकदा १००० रुपयांची गुंतवणूक करावी लागते.
कमाल गुंतवणुकीवर मर्यादा नाही. एनएससीमध्ये गुंतवणूक केल्यास कर सवलतीचा लाभ मिळतो.

Web Title :- Post Office Schemes 2023 | savings top 5 best small saving post office schemes 2023 interest rate tax benefits and maturity all you need to know

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime News | पोलीस असल्याचे सांगून तिघा चोरट्यांनी नेले अमेरिकन डॉलर चोरुन; गांजा बाळगल्याचे सांगत बॅग तपासणी करुन हातचलाखी

Gold Silver Rate | सोन्याचा भाव 500 रुपयांनी घसरला, चांदी सुद्धा झाली स्वस्त; जाणून घ्या 1 तोळा सोन्याचा नवीन दर

Pune Crime | पॅनकार्ड, आधार कार्डचा वापर करुन काढले 90 लाखांचे कर्ज