Post Office Schemes | पोस्ट ऑफिसची ‘ही’ योजना तुम्हाला देते बँकेपेक्षा जास्त रिटर्न; इन्कम टॅक्मध्ये सुद्धा मिळते सूट

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Post Office Schemes | पोस्ट ऑफिसच्या बचत योजना सर्वात सुरक्षित मानल्या जातात. Post Office Schemes योजनांमध्ये गुंतवणूक केल्यास तुम्हाला चांगला रिटर्न सुद्धा मिळतो. यापैकी अनेक योजना अशा आहेत, ज्या बँकेपेक्षा जास्त रिटर्न देतात. सोबत टॅक्समध्ये सूट सुद्धा दिली जाते. जर तुम्हाला एक सुरक्षित आणि लाभदायक गुंतवणूक करायची असेल तर पोस्टाच्या मुदत ठेव योजनेत (Fixed Deposit Scheme) गुंतवणूक करू शकता.

 

पोस्टात मुदत ठेव योजनेत गुंतवणूक (Post Office Schemes) केल्याने अनेक सुविधा मिळतात. सर्वात महत्वाची बाब म्हणजे यामध्ये तुम्हाला रिटर्नसह सरकारी गॅरंटी सुद्धा मिळते. येथे तिमाही आधारावर व्याजाची सुविधा सुद्धा मिळते.

 

Post Office Time Deposit Scheme योजनेअंतर्गत ठेव जमा करण्याचा कालावधी 1, 2, 3 किंवा 5 वर्षांचा असू शकतो आणि एका खात्यात फक्त एकच ठेव करता येते.

 

काय फायदे आहेत

– Post Office Time Deposit Scheme योजना गुंतवणूकीवर हमी परतावा प्रदान करते.

– 5 वर्षांचा POTD प्राप्तीकर कायद्याच्या कलम 80सी अंतर्गत कर कपातीसाठी पात्र आहे.

– 10 वर्षे आणि त्यापेक्षा जास्त वयाचे अल्पवयीन देखील त्यांचे खाते स्वतः चालवू शकतात.

– नामांकन सुविधा देखील उपलब्ध आहे.

– खाते एका पोस्टातून दुसर्‍या पोस्टात हस्तांतरित केले जाऊ शकते.

– ठेवीची रक्कम अकाली काढण्याची सुविधाही आहे.

– ही पोस्ट ऑफिस योजना FD पेक्षा सुरक्षित मानली जाते कारण गुंतवणूक केलेली मूळ रक्कम आणि मिळणारे व्याज सार्वभौम हमीद्वारे समर्थित आहे. (Post Office Schemes)

 

इतके मिळते व्याज

पोस्टाच्या या योजनेंतर्गत अकाऊंट किमान 1000 रुपये किंवा 100 रुपयाच्या पटीत उघडता येऊ शकते.
पोस्टाच्या योजनेत कोणतीही कमाल मर्यादा ठरलेली नाही.
पोस्ट ऑफिसच्या Time Deposit Account योजनेंतर्गत 7 दिवसांपासून 1 वर्षापर्यतच्या मुदत ठेवीवर 5.50 टक्के व्याज मिळते.

 

1 वर्ष 1 दिवसापासून 2 वर्षाच्या मुदत ठेवीवर सुद्धा हाच व्याजदर मिळतो.
तर 3 वर्षापर्यंतच्या मुदत ठेवीवर 5.50 टक्के दराने व्याज मिळते.
3 वर्ष आणि 1 दिवसापासून 5 वर्षापर्यंतच्या मुदत ठेवीवर 6.70 टक्के व्याज मिळते.

 

Web Title :- Post Office Schemes | this post office scheme gives you more returns than the bank you also get exemption in income tax

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा