PPF, सुकन्या, NSC मध्ये पैसे ठेवणार्‍यांसाठी मोठी बातमी ! सरकारच्या ‘या’ निर्णयामुळं होणार फायद्यावर परिणाम, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पोस्ट ऑफिस सेव्हिंग स्कीमवर अधिक नफा मिळविण्यासाठी आपल्याकडे केवळ १ दिवस शिल्लक आहे. नॅशनल सेव्हिंग्ज सर्टिफिकेट्स (NFC), पब्लिक प्रॉव्हिडंट फंड (PPF), किसान विकास पत्र (KVP) या सर्व छोट्या बचत योजनांवरील व्याजदर कमी करण्याचा निर्णय मोदी सरकार घेण्याची शक्यता आहे. सरकार लहान बचत योजनेवर दर तिमाही व्याज दर निश्चित करते. त्यात बदल करणे सरकारवर अवलंबून आहे.

ऑक्टोबर ते डिसेंबर तिमाहीच्या व्याज दरामध्ये कोणताही बदल नाही :
ऑक्टोबर ते डिसेंबर या तिमाहीच्या टपाल कार्यालयाच्या छोट्या बचत योजनांच्या व्याज दरामध्ये सरकारने कोणतेही बदल केले नाहीत. मिळालेल्या माहितीनुसार, जानेवारी ते मार्च 2020 या तिमाहीसाठी अल्प बचतीच्या योजनांच्या व्याजदरावर सरकार लवकरच घोषणा करेल.

पोस्ट ऑफिस योजना बँकांपेक्षा जास्त व्याज दर देत आहेत. बहुतेक व्यावसायिक बँका निश्चित ठेवींवर 6.25 टक्के ते 6.5 टक्के वार्षिक व्याज दर देत आहेत. त्याचबरोबर पोस्ट ऑफिस योजनेत सुमारे 7.5 टक्के व्याज मिळत आहे. 1 एप्रिल 2016 पासून सरकार त्रैमासिक तत्वावर छोट्या बचत योजनांचे व्याज दर निश्चित करीत आहे.

छोट्या बचत योजनांचे सध्याचे व्याज दर :
सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी : 7.9 टक्के
सुकन्या समृद्धि योजनेचा व्याज दर : 8.4 टक्के
ज्येष्ठ नागरिक बचत योजनेचे व्याज दर : 8.6 टक्के
राष्ट्रीय बचत प्रमाणपत्रे : 7.9 टक्के
किसान विकास पत्र : 7. 6 टक्के
राष्ट्रीय बचत मासिक उत्पन्न खाते : 7.6टक्के
नॅशनल सेव्हिंग्ज रिकरिंग डिपॉझिट अकाउंट इंटरेस्ट रेट : 7.2 टक्के

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/