सुकन्या, PPF, NSC च्या गुंतवणूकदारांसाठी मोठी बातमी ! सरकार 30 सप्टेंबरला घेऊ शकतं ‘हा’ निर्णय, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – मोदी सरकार 30 सप्टेंबरपर्यंत NSC आणि PPF सहित छोट्या बचत योजनांच्या व्याज दरात कपात करण्याचा निर्णय घेऊ शकते. छोट्या बचत योजनांवर व्याज दर 10 बेस पॉईंट म्हणजेच 0.10 टक्के कमी होऊ शकतात. ही कपात ऑक्टोबर ते डिसेंबर या तिमाहीसाठी लागू होईल. त्यात बदल करणे सरकारवर अवलंबून असते.

कमी होऊ शकते व्याजदर
आर्थिक वर्षातल्या तिसर्‍या तिमाहीत ऑक्टोबर ते डिसेंबरसाठी PPF, NSC, KVP यांच्या व्याज दरात कपात होऊ शकते. जुलै ते सप्टेंबर या तिमाहीत सरकारने पीपीएफ आणि इतर छोट्या बचत योजनांवर यापूर्वी 0.10 टक्के कपात केली आहे.

छोट्या बचत योजनांचे सध्याचे व्याज दर
राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र (NSC) – 7.9 %
सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (PPF): 7.9 %
सुकन्या समृद्धि योजना – 8.4%
ज्येष्ठ नागरिक बचत योजना -6..6%
किसान विकास पत्र (KVP) -7.6%

व्याज दर कमी करण्याचे कारण
आरबीआय बेंचमार्कमध्ये व्याज दर जोडल्यानंतर बँका देखील व्याज दर कमी करत आहेत. अलीकडेच बँकांनी मुदत ठेवींवरील व्याजदरही कमी केले आहेत. अशा परिस्थितीत लहान बचतीवरही व्याज दर कमी केले जाऊ शकतात.

ऑक्टोबर ते डिसेंबर तिमाहीसाठी सप्टेंबरच्या शेवटी व्याज दर निश्चित केले जातील. जुलै ते सप्टेंबर या तिमाहीत सरकारने पीपीएफ आणि इतर छोट्या बचत योजनांवर यापूर्वी 0.10 टक्के कपात केली आहे.

Visit : Policenama.com