home page top 1

सरकारच्या ‘या’ निर्णयामुळे PPF, NSC आणि सुकन्या योजनेत पैसे गुंतविणार्‍यांच्या फायदावर होणार परिणाम

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – केंद्र सरकार एनएससी आणि पीपीएफ बरोबरच सर्व छोट्या बचत योजनांवरील व्याज दरात कपात करण्याचा निर्णय घेऊ शकते. छोट्या बचत योजनावरील व्याजदर 0.30 टक्क्यांने कमी होऊ शकतात. ही कपात जुलै ते सप्टेंबर या दरम्यान लागू होऊ शकते. सरकारच्या या निर्णयानंतर बँकांना देखील त्याच्या डिपॉजिटमधील व्याज दरात कपात करावी लागू शकते. सरकार ‘स्मॉल सेविंग्स स्कीम’ बाबत दर तिमाहीने व्याज दर ठरवत असते.

छोट्या बचत योजनांचे हे आहेत सध्याचे व्याजदर –
पब्लिक प्रोविडंट फंड – पीपीएफ व्याजदर – 8 %
सुकन्या समृद्धि योजना – व्याजदर – 8.5 %
वरिष्ठ नागरिक बचत योजना – व्याजदर – 8.7 %
राष्ट्रीय बचत पत्र – व्याजदर – 8 %
शेतकरी विकास पत्र – व्याजदर – 7.7 %
या सारख्या इतर छोट्या बचत योजनामधील व्याज दरात सरकार कपात करु शकते.

वित्त वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत जुलै ते सप्टेंबर या कालावधीत PPF, NSC, KVP याच्या व्याजदरात कपात होऊ शकते. याआधी सप्टेंबर 2018 ला सर्वात जास्त व्याजदर वाढण्यात आला होता. छोट्या बचत योजनांचे कायम परिक्षण करण्यात येत असते, मागील महिन्यात तिसऱ्या तिमाहीत (ऑक्टोबर-डिसेंबर) सरकारने सप्टेंबर 2018 ला व्याज दरात वाढ करण्याची घोषणा केली होती. मात्र यंदा सरकार या बचत योजनेत व्याज दरात कपात करणार आहे. याचा फायदा सामान्याचा पोहचवण्याचा सरकरचा प्रयत्न आहे.

आरोग्य विषयक वृत्त

मध ‘या’ ७ पदार्थांसोबत खाल्ल्यास आरोग्यासाठी घातक

तोंडाची स्वच्छता न राखल्यास वाढतो हार्ट अटॅकचा धोका

देशात मुलींची संख्या घटली, अखेर मानवी हक्क आयोगाकडून दखल

गरोदरपणातच स्ट्रेच मार्क्स होतात, हे चूकीचे ; जाणून घ्या सत्य

Loading...
You might also like