पोस्ट ऑफिसच्या ‘या’ 4 स्कीममध्ये लावा पैसे आणि बना लखपती, जाणून घ्या किती मिळते व्याज

नवी दिल्ली : जर तुम्ही सुद्धा पोस्ट ऑफिसमध्ये पैसे लावण्याचा प्लॅन करत असाल तर आता तुम्हाला तुमच्या पैशांची बिलकुल चिंता करण्याची गरज नाही. पोस्ट ऑफिसच्या अनेक स्कीम आहेत ज्यामध्ये तुम्ही गुंतवणूक केली तर तुम्ही काही वर्षातच कोट्यधीश बनू शकता. आज आम्ही तुम्हाला पोस्ट ऑफिसच्या काही स्कीमबाबत सांगणार आहोत, ज्याद्वारे बंपर फायदा कमावू शकता. यामध्ये 5 वर्ष ते 15 वर्षापर्यंतच्या योजना आहेत.

या स्कीमध्ये लावा पैसा
पोस्ट ऑफिसच्या कोट्यधीश बनवणार्‍या 4 स्कीम्स – या लिस्टमध्ये पब्लिक प्रॉव्हिडेंट फंड (पीपीएफ), रिकरिंग डिपॉझिट (आरडी), नॅशनल सेव्हिंग्स सर्टिफिकेट (एनएससी) आणि टाइम डिपॉझिट (टीडी) स्कीम आहे. या स्कीमद्वारे गुंतवणुकदार काही वर्षातच मोठा फंड बनवू शकतो.

चेक करा कोणत्या स्कीमवर किती व्याज

* Public Provident Fund : 7.1 टक्के
* Savings Deposite : 4 टक्के
* 1 Year time deposite : 5.5 टक्के
* 2 Year time deposite : 5.5 टक्के
* 3 Year time deposite : 5.5 टक्के
* 5 Year time deposite : 6.7 टक्के
* 5 Year Recurring Deposite : 5.8 टक्के
* 5 Year SCSS : 7.4 टक्के
* 5 Year MIS : 6.6 टक्के
* 5 Year NSC : 6.8 टक्के

किसान विकास पत्र
यात मॅच्युरिटी पीरियडनंतर गुंतवलेली रक्कम दुप्पट परत मिळते. यामध्ये कमीतकमी 1,000 रुपयांची गुंतवणूक करू शकता. कमला गुंतवणूक रक्कमेची मर्यादा नाही. विशेषता शेतकर्‍यांसाठी ही योजना आहे.

पोस्ट ऑफिस आरडी
याद्वारे गुंतवणूक करून आपली स्वप्न तुम्ही सहज पूर्ण करू शकता. आरडी खाते पाच वर्षासाठी उघडता येते.

नॅशनल सेव्हिंग्ज स्कीम
या योजनेवर सध्याच्या तिमाहीत 6.8 टक्के रिटर्न मिळते. यातील गुंतवणुकीवर 5 वर्षाच्या लॉकइन पीरियड असतो. म्हणजे 5 वर्षाअगोदर पैसे काढू शकत नाही.

सुकन्या समृद्धी योजना
सुकन्या स्कीम मुलींसाठी आहे. 21 वर्षाच्या वयात मुली या खात्यातून पैसे काढू शकतात. या स्कीममध्ये 9 वर्ष 4 महिन्यात रक्कम डबल होईल.