Post Office Started New Service | पोस्ट ऑफिसने सुरू केली नवीन सेवा ! आता घरबसल्या PPF, RD, सुकन्या समृद्धीमध्ये (SSY) करा गुंतवणूक

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Post Office Started New Service | नवीन आर्थिक वर्ष सुरू झाले आहे (New Financial Year). अशा स्थितीत, जर तुम्हाला कर बचतीसाठी पीपीएफ Public Provident Fund (PPF) , आरडी Recurring Deposit Account (RD) किंवा सुकन्या समृद्धीमध्ये Sukanya Samriddhi Yojana (SSY) गुंतवणूक करायची असेल, तर तुम्ही हे काम घरी बसून करू शकता. पोस्ट ऑफिसच्या डोअरस्टेप बँकिंगद्वारे ही सुविधा मिळू शकते (Post Office Doorstep Banking Service). पोस्ट ऑफिसची ही सेवा देशभरातील (Post Office Started New Service) प्रत्येक जिल्हा, शहर आणि गावातील नागरिकांसाठी उपलब्ध आहे. (Investment In Post Office PPF, RD, SSY)
IPPB नुसार, डोअरस्टेप बँकिंगद्वारे (IPPB Doorstep Banking) तुम्ही बँक खाते, फंड ट्रान्सफर, रोख ठेव, पैसे काढणे, बिल भरणे, जीवन विमा खरेदी करणे, लहान बचतींमध्ये गुंतवणूक करणे इत्यादी गोष्टी करू शकता. मात्र, डोअरस्टेप बँकिंग सेवेसाठी, तुम्हाला 20 रुपये शुल्क भरावे लागेल.
आयपीपीबी डोअरस्टेप बँकिंग सेवा ऑनलाइन कशी करावी बुक
डोअर स्टेप बँकिंग सुविधेचा लाभ घेण्यासाठी तुम्ही पोस्ट ऑफिस कॉल सेंटर नंबर – 155299 वर कॉल करून बुक करू शकता. IPPB वेबसाइटनुसार, तुम्ही सकाळी 11:00 ते सायंकाळी 4 दरम्यान स्लॉट निवडू शकता.
IPPB डोअरस्टेप बँकिंगमध्ये घेवू शकता या सेवा
1. खाते उघडणे
2. रोख ठेव / काढणे
3. फंड ट्रान्सफर
4. 24×7 फंड ट्रान्सफर
5. रिचार्ज आणि बिल पेमेंट
6. विमा/सामान्य विमा/म्युच्युअल फंड खरेदी
7. आधारमध्ये (Aadhaar Card) मोबाईल नंबर अपडेट
8. डिजिटल लाईफ सर्टिफिकेट जनरेशन (Digital Life Certificate)
9. सुकन्या समृद्धी, PPF, RD, PLI, RPLI मध्ये गुंतवणूक
Web Title :- Post Office Started New Service | post office started new service now invest in ppf rd sukanya samriddhi sitting at home
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update