छोटया बचत योजनांमध्ये सहभागी होणं झालं सोपं, पोस्ट ऑफिसनं उचचलं ‘हे’ पाऊल, जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –  पीपीएफसह अन्य छोट्या बचत योजना ग्रामीण भागापर्यंत पोहचाव्यात यासाठी पोस्ट खात्याने एक मोठे पाऊल उचलले आहे. हे लागू झाल्यानंतर छोट्या बचत योजनांमध्ये गुंतवणूक करणे खुप सोपे होईल.

पोस्ट खात्याने आता सर्व छोट्या बचत योजनांचा विस्तार करून शाखा पोस्ट ऑफीस स्तरापर्यंत केला आहे. ग्रामीण क्षेत्रात 1 लाख 31 हजार 113 पोस्ट ऑफीस काम करत आहेत.

पत्र, स्पीड पोस्ट, पार्सल, इलेक्ट्रॉनिक मनी ऑर्डर, ग्रामीण पोस्ट आयुर्विमा सुविधांशिवाय, या पोस्ट ऑफिसद्वारे आता पोस्ट बचत खाते, आवर्ती ठेव, सावधी जमा आणि सुकन्या समृद्धी खाते योजना सुद्धा प्रदान करण्यात येत आहे.

नव्या आदेशांद्वारे शाखा पोस्ट ऑफिसला सार्वजनिक निर्वाह निधी, मासिक उत्पन्न योजना, राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र, किसान विकासपत्र आणि ज्येष्ठ नागरिक बचत योजनांची सुविधा प्रदान करण्याची सुद्धा परवानगी मिळाली आहे.

ग्रामीण लोकांना आता त्याच पोस्ट बचत बँकेच्या सुविधा प्राप्त होतील, ज्यांचा लाभ शहरातील लोक घेत आहेत.

ते आपली बचत, आपल्या गावातील पोस्टाच्या माध्यमातूनच लोकप्रिय योजनांमध्ये जमा करू शकतील.

सरकारकडून प्रत्येक तीन महिन्याला छोट्या बचत योजनांच्या व्याजदरांचे पुनरावलोकन केले जाते. 1 जुलैपासून 30 सप्टेंबर 2020 पर्यंत वेगवेळा छोट्या बचत योजनांवर व्याजदर मागील तिमाहीच्या समान आहे.