प्रभासच्या ‘साहो’ सिनेमाचे नवीन पोस्टर ‘रिलीज’ , पहा प्रभासचा अंदाज

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूडमधील बहुप्रतिक्षित सिनेमा साहो बाबत चाहते खूपच एक्साइटेड आहेत. बाहुबली मध्ये आपली जादू दाखवल्यानंतर प्रभास आता श्रद्धा कपूर सोबत साहो या सिनेमात अ‍ॅक्शन करताना दिसणार आहे. या सिनेमाचा आणखी एक नवीन पोस्टर समोर आला आहे. ज्यात प्रभास खूपच स्टायलिश आणि अ‍ॅक्शन करताना दिसत आहे. यात तो बाईकवर स्वार असल्याचेही दिसत आहे. १५ ऑगस्ट रोजी हा सिनेमा रिलीज होणार आहे.

प्रभासने स्वत: या सिनेमाचे नवीन पोस्टर सोशलवर शेअर केले आहे. या पोस्टरला खास कॅप्शनही दिलं आहे. कॅप्शनमध्ये प्रभास लिहितो की, “अजून एक दिवस, काय तुम्ही साहोच्या जगात सवारी करण्यासाठी तयार आहात ? साहोचा टीजर उद्या प्रदर्शित होणार आहे.” या पोस्टरसोबतच प्रभासने सांगितले आहे की, साहोचा टीजर ११.२३ वाजता रिलीज होणार आहे. या पोस्टरमध्ये दिसत आहे की, प्रभास बाईकवर बसलेला आहे. प्रभासच्या मागे काही गाड्याही उडताना दिसत आहे.

श्रद्धा कपूरचा या सिनेमातील फर्स्ट लुकही समोर आला आहे. फोटोत श्रद्धा कपूर लाल रंगाच्या जॅकेटमध्ये दिसत आहे. तिच्या हातात पिस्टलही दिसत आहे. असं म्हटलं जात आहे की, श्रद्धा या सिनेमात कॉपच्या भूमिकेत दिसू शकते. या सिनेमासाठी उत्सुक असणारे चाहते आता या सिनेमाच्या टीजरसाठी आतुर झाल्याचे दिसत आहे. कधी एकदा टीजर रिलीज होईल आणि आपण तो पाहू असं त्यांना वाटत आहे.

आरोग्यविषयक वृत्त (www.arogyanama.com)

धक्कादायक ! भारतीयांचं वयोमान वायू प्रदूषणामुळे तब्बल ‘एवढ्या’ वर्षांनी झाले कमी

‘या’ कारणामुळे सकाळी उठल्यावर मोबाईलचा वापर शक्यतो टाळाच

यामुळे कारणांमुळें वाढत महिलांचं वजन

फिट राहण्यासाठी दीपिकाचा नवीन फंडा

 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like