भाजपा प्रवेश देणे आहे, पुण्यातील ‘भन्‍नाट’ पोस्टरबाजीव्दारे ‘टोलेबाजी’

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – सध्या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमिवर राज्यात मोठ-मोठ्या घडामोडी घडत आहेत. विधानसभेसाठी भाजप-शिवसेनेत काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांची इनकमिंग जोरदार सुरु आहे. त्यावरून राष्ट्रवादीकडून भाजप-शिवसेना फोडाफोडीचं राजकारण करत असल्याचा आरोप होत आहे. त्यात नवी मुंबईतील ५२ नगरसेवकांनी भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेत राष्ट्रवादीला झटका दिला आहे. त्यात काँग्रेसचेही नेत्यांची भाजपप्रवेशाचे सत्र सुरु आहे. त्यामुळे भाजपमध्ये होणाऱ्या इनकमिंगवर टीका करणारे एक पोस्टर पुण्यात झळकले आहे.

हे पोस्टर म्हणजे भाजपच्या इनकमिंगची जाहिरात असल्याचे दिसत आहे. यावर भाजपमध्ये प्रवेश देणे आहे, असा उल्लेख या पोस्टरवर करण्यात आला आहे. भाजपमध्ये येण्यासाठी त्यावर काही अटी लावण्यात आल्या आहेत. या अटींमध्ये पहिली अट म्हणजे ज्यांना ईडी आणि इन्कम टॅक्सकडून नोटीस आली आहे, त्यांना प्राधान्य देण्यात येईल. भ्रष्टाचाराचा अनुभव असल्यास त्या व्यक्तीला पहिली पसंती देण्यात येईल. तर तिसरी अट म्हणजे सहकार क्षेत्र बुडवल्याचा अनुभव असणाऱ्यांनाही घेण्यात येईल, अशा प्रमुख अटी आहेत. या अटींद्वारे भाजपमध्ये होणाऱ्या इनकमिंगची खिल्ली उडवण्यात आली आहे.

हे पोस्ट कोण्या अज्ञात व्यक्तीकडून लावण्यात आले आहेत. तसंच या पोस्टरच्या खालच्या पट्टीवर विचारधारेची कुठलीही अट नाही. तसंच आमच्याकडे जागा फुल झाल्यावर मित्रशाखेत अ‍ॅडजस्ट करता येईल, असा टोमणाही मारण्यात आला आहे.

दरम्यान, हा पोस्टर कोणी लावला हे अद्याप समजले नाही. यात मित्र पक्ष म्हणजे शिवसेना असे समजले जात आहेत. कारण राष्ट्रावादी शिवेसनेच्या अधिकाधिक नेत्यांनी भाजप आणि शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यामुळे त्यांच्यावर हास्यास्पद टीका करणारे हे पोस्टर लावण्यात आले आहे.

आरोग्यविषयक वृत्त –