खरंच की काय ! आता गोव्यात होणार चक्क ‘NUDE’ पार्टी, पोलिसांची उडाली भंबेरी

पणजी : वृत्तसंस्था – गोव्यात न्यूड पार्टी होणार असल्याचे समोर आले आहे. सोशल मीडियावरून तशी माहिती समजत आहे. गोव्यातील या न्यूड पार्टीचे पोस्टर्स सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत. यानंतर आता पोलिसांनी या संदर्भात तपास सुरू केला आहे.

व्हायरल होणाऱ्या न्यूड पार्टीच्या पोर्स्टर्समुळे गोव्यात खळबळ उडाली आहे. गेल्या दोन दिवसांपासून न्यूड पार्टीचे दोन पोस्टर्स सोशलवर फिरत आहेत. पोस्टर्सवरून मिळालेल्या माहितीनुसार, उत्तर गोव्यातील मोरजिम सुमद्र किनारी ही न्यूड पार्टी होणार आहे. या संदर्भात बोलताना पोलीस म्हणाले, “याबाबत चौकशी सुरू करण्यात आली आहे. आम्ही असे प्रकार राज्यात होऊ देणार नाही. गोव्यात अशा पार्ट्यांचे आयोजन करणाऱ्यांचा शोध लावला जाईल.” असे त्यांनी स्पष्ट केले.

या पार्टीमध्ये 15 परदेशी महिला आणि 10 पेक्षा जास्त भारतीय महिलांचा समावेश असणार आहे. असा दावा व्हायरल होणाऱ्या पोस्टरमध्ये केला जात आहे. इतकेच नाही तर चकित करणारी बाब अशी की, या पार्टीत सहभागी होणाऱ्याला हवा तसा सेक्स करता येणार आहे असंही पोस्टरमध्ये नमूद करण्यात आलं आहे. या पोस्टरमध्ये संपर्कासाठी नंबरही देण्यात आला आहे.

संपर्कासाठी देण्यात आलेल्या नंबरवर कॉल केला असता तो फोन सतत व्यस्तच लागत आहे. ही न्यूड पार्टी कधी आणि नेमकी कोणत्या ठिकाणी असणार आहे हे मात्र अद्याप समोर आलेलं नाही. ही पार्टी खरंच आहे की, फक्त अफवा आहे हेही अद्याप समोर आलेलं नाही. त्यामुळे पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. लवकरच सत्य काय ते समोर येईलच असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.