सुशांत सिंह राजपूतच्या जीवनावर प्रेरीत सिनेमा ‘Suicide or Murder’ चं पोस्टर रिलीज ! ‘हा’ अभिनेता प्रमुख भूमिकेत

पोलिसनामा ऑनलाईन – फिल्म निर्माते विजय शेखर गुप्ता यांनी सुशांत सिंह राजपूतच्या जीवनावर आधारीत सिनेमा तयार करण्याची घोषणा केली होती. सुसाई़ड ऑर मर्डर : अ स्टार वॉज लॉस्ट असं या सिनेमाचं नाव आहे. याचं फर्स्ट पोस्टर रिलीज करण्यात आलं आहे. एका मुलाखतीत बोलताना निर्माते म्हणाले, “फिल्म इंडस्ट्रीतील बडे स्टार्स आणि प्रॉडक्शन हाऊसचा एकाधिकार संवपण्यासाठी हा सिनेमा तयार करत आहोत. सुशांतच्या मृत्यूनं देशाला मोठा झटका बसला आहे.”

विजय शेखर गुप्ता यांनी इंस्टावरून सिनेमाचं फर्स्ट पोस्टर रिलीज केलं आहे. सिनेमात सचिन तिवारी प्रमुख भूमिकेत आहे. पोस्टर शेअर करताना कॅप्शनमध्ये विजय म्हणतात, लहान शहरातून आलेला एक मुलगा फिल्म इंडस्ट्रीतील चमकता स्टार झाला. हा त्याचा प्रवास आहे.”

कधी रिलीज होणार सिनेमा ?

सिनेमाच्या पोस्टरसोबत विजय शेखर गुप्ता यांनी असं सांगितलं की, सिनेमाची शुटींग मुंबई आणि पंजाबमध्ये होणार आहे. हा सिनेमा 2020 च्या ख्रिसमसला रिलीज होऊ शकतो. हा सिनेमा सुशांतचा बायोपिक नाही तर त्याच्या जीवनापासून प्रेरीत सिनेमा आहे.

डायरेक्शन आणि इतर गोष्टी

सुसाई़ड ऑर मर्डर : अ स्टार वॉज लॉस्ट सिनेमाची स्टोरी विजय शेखर गुप्तांच्या कल्पनेवर आधारीत आहे. तेच हा सिनेमा प्रोड्युस करत आहेत. डायरेक्टर शामिक मौलिक या सिनेमाचं डायेरक्शन करत आहेत. सिंगर आणि म्युझिक डायेरक्टर श्रद्धा पंडित म्युझिक डायरेक्शन करण्याचं काम करणार आहे.

एका मुलाखतीत बोलताना विजय शेखर गुप्ता म्हणाले, “याआधी जिया खान आणि दिव्या भारती यांनीही असंच केलं आहे. असं वारंवार होत आहे. म्हणजेच यामागे नक्कीच काहीतरी कारण असेल.”

कोण आहे सचिन ?

सिनेमात सचिन तिवारी प्रमुख भूमिका साकारत आहेत. सचिन उत्तर प्रदेशातील रायबरेलीतील रहिवासी आहे. अलीकडेच तो सुशांत सिंह राजपूताच डुप्लीकेट असल्यानं खूप चर्चेत आला होता.