‘स्टुडंट ऑफ द इयर 2’चे पोस्टर रिलीज, असा आहे टायगर श्रॉफचा लुक

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – स्टुडंट ऑफ द इयर 2 चा पोस्टर नकुताच रिलीज झाला आहे. स्टुडंट ऑफ द इयर चा सिक्वल असणारा हा सिनेमा 10 मे रोजी प्रदर्शित होणार आहे. या सिनेमातील अनन्या पांडे, टायगर श्रॉफ तारा सुतारिया यांचा लुकही समोर आला आहे.

रिलीज झालेल्या पोस्टर्समध्ये टायगर श्रॉफचा हटके आणि स्टायलिश लुक दिसत आहे. टायगर एका गेटच्या बाहेर उभा असल्याचे दिसत आहे. त्याच्या हातात काळ्या रंगाची बॅगही दिसत आहे. हे पोस्टर्स रिलीज होण्याआधी करण जोहरने एकदा ट्विट करत सांगितले होते की, स्टुडंट ऑफ द इयर 2 चे नवे सेशन सुरु होणार आहे.

करण जोहर आणि टायगर श्रॉफ या दोघांनीही या चित्रपटाचे तीनही पोस्टर्स आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून शेअर केले आहेत. पहिल्या पोस्टरमध्ये दोन विद्यार्थ्यांचे शुज दिसत आहेत. या फोटोला खास कॅप्शनही देण्यात आले आहे. टेक स्टेप, टेक चॅलेंज असे कॅप्शनध्ये लिहिलेले दिसत आहे.