‘ठग्स ऑफ हिंदुस्तान’ची कातिल ठग

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन

आमिर खानचा बहुचर्चीत ‘ठग्स ऑफ हिंदुस्तान’ चित्रपटाचे एकानंतर एक दमदार पोस्टर सध्या रिलिज होत आहेत. चित्रपटाच्या पोस्टरचा श्रीगणेशा महानायक अभिताभ बच्चन यांनी केला. यानंतर फातिमा सना शेखचे पोस्टर रिलिज करण्यात आले. आता ठगच्या आणखी एका अभिनेत्रीचे पोस्टर रिलिज करण्यात आले आहे. ही अभिनेत्री आहे ठग्सची कैटरीना कैफ. पोस्टरच्या रिलिजनंतर कैटरीनाचे फॅन तिची कौतुक करत थकत नाहीयेत.

चित्रपटात कटरिना एका डान्सरच्या भुमिकेत दिसणार आहे. सुरैया असे तिचे या चित्रपटातील नाव असणार आहे. पोस्टर मधील आपल्या कातिल अदांनी कटरिनाने सगळ्यांनाच घायळ केले आहे. बहादर पोस्टरमुळे ‘ठग्स ऑफ हिंदुस्तान’ लोकप्रियता अधिकाअधिक वाढत चालली आहे. तर, दर्शकांची उत्कंठा शिगेला पोहचली आहे.

विजय कृष्णा आचर्या व्दारे निर्देशन ‘ठग्स ऑफ हिंदुस्तान’ ८ नोव्हेंबर २०१८ला रिलीज होणार आहे. चित्रपटात सुरैयाचा अभिनय करणारी कैटरीना आमिर खानच्या प्रेमात पडता दाखवली आहे. धूम ३ नंतर ही जोडी पुन्हा एकदा पहायला मिळणार आहे. आता फक्त बघायचय ही जोडी यावेळी प्रेषकांच्या किती पसंतीस उतरते. धूम ३ प्रमाणे एक्शन स्टंट नसले तरी या चित्रपटात कैटरीनाचा रोल दमदार असल्याचे बोले जात आहे.

[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’70a041cf-bd89-11e8-93a8-2b92d77702df’]

पोस्टर रिलिजनंतर आमिर खानने आपल्या टिव्टर अकाऊंटवर लिहीले की, बद्दल बोलताना कैटरीना म्हणाली की, सुरैया जान… सगळ्या सुंदर ठग ! धूम 3 पासुनच माझ मन हिच्यावर आल आहे……. पण, सांगण्याची हिम्मत झाली नाही. कोणी त्यांना सांगितल तर कृपा होईल.

गणेशोत्सव काळात परीक्षा; शाळांविरोधात तक्रार