‘आय लव्ह यु शिवडे’ नंंतर ‘स्मार्ट बायका कुठे जातात ?’ पोस्टरबाजीने खळबळ

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन

“पुणे तिथे काय उणे ” ही म्हण तर सर्वानाच ठाऊक आहे पण खरचं पुणेकरांची कोणत्याही बाबतीत शक्कल लढवायची डोक्यालिटी काही विचारूच नका. पुण्यात काही दिवसांपूर्वी एका प्रियकराने आपल्या मैत्रिणीला संदेश देण्यासाठी ‘आय लव्ह यु शिवडे’ अशा प्रकारचा मजकूर लिहून शहरभरात पोस्टरबाजी केली होती. या ‘आय लव्ह यु शिवडे ‘ च्या पोस्टरबाजीने भन्नाट चर्चा अख्या पुण्यामध्ये झाली होती. आता त्याच प्रमाणे आणखी एका पुणेकराने “स्मार्ट बायका कुठे जातात ? या जागेवर लक्ष ठेवा … १५ ऑक्टोबर’ अशी पोस्टरबाजी सुरु केली आहे.
[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’e1c08c8f-cd20-11e8-8889-8701c58d22e8′]

स्मार्ट बायका कुठे जातात ? पोस्टरविषयी …

पुणेरी पाट्या तर प्रसिद्ध आहेतच पण “स्मार्ट बायका कुठे जातात ? या जागेवर लक्ष ठेवा… १५ ऑक्टोबर ” अशा प्रकारे लिहले गेलेले पोस्टर आता प्रत्येक व्यक्तीचे लक्ष्य वेधून घेत आहे. पुणे-मुंबई हायवेला लागून असणाऱ्या आकुर्डी चौक ते साने चौक दरम्यान हे पोस्टर लागलेले आहेत.
[amazon_link asins=’B07CRCPM4T’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’e77cbf44-cd20-11e8-97a2-0b36d2242e9e’]

आता नवरात्रीचा सण लक्षात घेता आणि पोस्टरचा मजकूर लक्षात घेता एखाद्या दुकानाची जाहिरात असावी असा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येतो आहे.  ही नेमकी जाहिरात आहे का आणखी काही याचा उलघडा १५ ऑक्टोबर लाच होणार असे दिसते आहे. पण ही जाहिरात असेल तर पुणेकरांना शोभेल असा फंडा वापरण्यात आला आहे. पण काही म्हणा ‘आय लव्ह यु शिवडे ‘ नंतर आता अशा पोस्टरबाजीचा ट्रेंड होतोय की काय असे वाटू लागले आहे. पण हे पोस्टर मात्र येणाऱ्या जाणारऱ्याचे लक्ष वेधून घेत आहे हे मात्र नक्की.