ओबीसींच्या स्वतंत्र जनगणनेसाठी लोकांनीच घरावर लावल्या ‘अशा’ पाट्या

चंद्रपूर : पोलीसनामा ऑनलाइन – 2021 मध्ये होणाऱ्या जनगणनेमध्ये ओबीसींसाठी स्वतंत्र कॉलम द्यावा या मागणीसाठी अनेकांनी आपल्या घराबाहेर ठराविक पाट्या लावायला सुरुवात केली आहे. अ‍ॅड. अंजली साळवी विटणकर यांनी ‘जनगणना 2021 मध्ये सहभाग नाही’ अशा पाट्या आपल्या घराबाहेर लावण्याची मोहीमच सुरु केली आहे. ही मोहीम त्यांनी स्वतःच्या घराबाहेर पाटी लावण्यापासून सुरु केली आहे. मोठ्या वेगात आता ही मोहीम संपूर्ण चंद्रपूर जिल्ह्यात पसरत आहे.

2011 मध्ये होणाऱ्या जनगणनेमध्ये आता ओबीसीसाठीच्या स्वतंत्र रकान्याची मागणी करण्यात येत आहे. यासाठी अ‍ॅड. अंजली साळवी विटणकर यांनी समस्त ओबीसी बांधवांना या मोहिमेमध्ये सामील होण्याचे आव्हान केले आहे. तसेच यासंबंधीचे आव्हान खासदारांनी करावे अशी देखील मागणी करण्यात येत आहे.

केंद्र सरकारने जनगणना मोजणी संदर्भातील प्रक्रिया सुरु केलेला असताना या विरोधात अ‍ॅड. अंजली साळवी विटणकर यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात धाव घेऊन मध्यस्थी अर्ज दाखल करून जनगणना 2011 ला आव्हान दिले आहे.

चंद्रपूर जिल्ह्यातून या मोहिमेला मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळत आहे आणि संपूर्ण जिल्ह्यात आता लोकांनी या मागणीसाठी अशा प्रकारच्या पाट्या लावल्याचे पहायला मिळत आहे. केंद्र सरकारद्वारा 2021 च्या जणगणनेसाठीचा कार्यक्रम आखण्यात आलेला आहे.

Visit : Policenama.com