काँग्रेसच्या ‘या’ बालेकिल्ल्यातच राहुल गांधींविरोधात ‘पोस्टरबाजी’

अमेठी : वृत्तसंस्था – एका सभेदरम्यान काँगेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी जैश-ए-मोहम्मद चा संस्थापक मसूद अजहर याला आपल्या भाषणात मसूदजी असा उल्लेख केला. त्यावरून राजकीय क्षेत्रात राहुल गांधी यांच्यावर टीकेची झोड उठली आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पूर्वी केलेल्या राहुल गांधींच्या वक्तव्याचा काँग्रेसच्या बालेकिल्ल्यामध्येच विरोध होत आहे. अमेठीमध्ये राहुल गांधी यांच्याविरोधात पोस्टरबाजी सुरू झाली आहे. जैश-ए-मोहम्मदचा म्होरक्या मसूद अजहर आणि राहुल गांधी यांचा फोटो पोस्टरवर छापण्यात आला आहे.

बीजेवायएम कडून अमेठीत पोस्टरबाजी

दहशतवादी मसूदला अजहरजी बोलणाऱ्या राहुल गांधी यांच्याविरोधात अमेठीमध्ये भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाने (बीजेवायएम) अमेठीत पोस्टरबाजी केली आहे. बीजेवायएमचा कार्यकर्ता शुभम तिवारी याने लावलेल्या या पोस्टरमध्ये पुलवामा हल्ल्याचा मास्टरमाईंड मसूद अजहर आणि राहुल गांधी दिसत आहे. राहुल गांधी मसूदचा सन्मान करताना या पोस्टरमध्ये दाखवण्यात आले आहे. तसेच जो दहशतवाद्यांना आदरयुक्त जी बोलतो त्याला तसा खासदार अमेठीमध्ये नको, असे लिहिण्यात आले आहे.

तसेच यात पुढे लिहिण्यात आले की, देशाच्या पंतप्रधानांचा अपमान करणारा, दहशतवाद्यांचा सन्मान करणारा खासदार अमेठीकरांनी नाकारावा. याबाबत बोलताना तिवारी म्हणाले की, ‘राहुल गांधींनी दहशतवाद्याचा आदर करून हिंदुस्थानचा अपमान केला आहे. अमेठीमध्ये राहुल गांधींविरोधात लोकांमध्ये संताप आहे.’

ह्याहि बातम्या वाचा –

रोहित शेट्टीचा संघर्षमय प्रवास

डॉ. सुजय विखे जाणार खा. गांधी, माजी आ. राठोड यांच्या भोटीला

बाळासाहेब थोरात काही हायकमांड नाहीत : विखे-पाटील

नाना पटोलेंना माझा आशिर्वाद : नितीन गडकरी

बाळासाहेब थोरातांना स्पष्टीकरण द्यायला मी बांधिल नाही , ते काही हायकमांड नाहीत