युतीची घोषणा : शिवसेना भवनाबाहेर राष्ट्रवादीची पोस्टर बाजी 

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – भाजप आणि शिवसेना या पक्षात झालेल्या युतीनंतर आता त्यांना राष्ट्रवादी कडून लक्ष करण्याचा प्रकार सुरु झाला आहे. अमित शहा ,उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थित काल युतीची घोषणा झाली. त्यानंतर राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने “आम्ही सत्तेला लाथ मारू या ऐतिहासिक वाक्याला भावपूर्ण श्रद्धांजली” असे फलक झळकवण्यात आले आहेत.

राष्ट्रवादीच्या या बॅनरबाजीमुळे शिवसेनेचे नेते भडकण्याची शक्यता आहे. शिवसेनेने भाजप सोबत सत्तेत राहून भाजपवर नेहमीच तोंडसुख घेतले आहे. त्यामुळे अशी पार्श्वभूमीवर शिवसेनेने भाजप सोबत केलेली युती हि कोणालाच रुचणारी नाही. म्हणून राष्ट्रवादीने पोस्टरबाजी केली आहे.

image.png
दरम्यान हिंदुत्वाच्या मुद्द्यावर आम्ही एकत्र आलो आहे असे दोन्ही पक्षांनी म्हणले आहे. तर दोन्ही पक्ष एकत्र लढतील आणि दोन्ही निवडणुका जिंकतील असा विश्वास अमित शहा यांनी काल झालेल्या पत्रकार परिषदेत व्यक्त केला आहे. शिवसेनेने भविष्यकालीन तोटा ओळखून भाजपच्या सोबत जाणे पसंत केले आहे असे राजकीय जाणकारांनी म्हणले आहे. तर बाळासाहेबांचा स्वाभिमान शिवसेनेत राहिला नाही अशी टीका देखील विरोधी पक्षाच्या नेत्यांकडून केली जात आहे.