Postpartum Workout | आलिया भट्टने सुरू केला योग क्लास; जाणून घ्या ‘पोस्टपार्टम वर्कआउट’चे ५ फायदे

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Postpartum Workout | रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि आलिया भट्ट (Alia Bhatt) हे बॉलिवूडमधील सर्वात फेव्हरेट कपल (couple of Bollywood) आहे. या वर्षी १४ एप्रिल रोजी दोघांनी लग्न केले आणि ६ नोव्हेंबर रोजी ते आई-वडील झाले. आलिया आणि रणबीरने आपल्या मुलीचे नाव राहा ठेवले आहे. डिलिव्हरीनंतर पहिल्यांदाच, आलियाचा फोटो तिची बहीण शाहीन भट्टच्या वाढदिवसाच्या निमित्ताने समोर आला आणि आलिया फिट असल्याचे पाहून चाहत्यांना आश्चर्य वाटले. ती काही दिवसांपूर्वी योगा स्टुडिओमधून बाहेर पडताना दिसली होती आणि ती खूपच सुंदर दिसत होती. जर तुम्हीदेखील नुकतीच आई झाला असाल आणि बाळंतपणानंतर फिटनेसचा अवलंब करायचा असेल तर तुम्ही पोस्टपार्टम वर्कआउट्स (Postpartum Workout) सुरू करू शकता. आज आम्ही तुम्हाला पोस्टपार्टम वर्कआऊटचे ५ फायदे सांगणार आहोत.

 

१. पोस्टपार्टम डिप्रेशन
तासभर घराबाहेर पडणे आणि स्वतःवर लक्ष केंद्रित करण्याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे पोस्टपार्टम डिप्रेशन दूर होते. वर्कआउटमुळे हॅप्पी हार्मोन्स रिलिज होतात, ज्यामुळे तुम्हाला हलके आणि आनंदी वाटते.

 

२. बूस्ट एनर्जी
बाळाच्या जन्मानंतर आईला सर्व एनर्जीची आवश्यकता असते. दिवस वर्कआउटने सुरू केल्याने झटपट एनर्जी मिळते, जी दिवसभर सक्रिय राहण्यास मदत करते.

३. चांगली झोप
नवीनच माता झालेल्या प्रत्येक आईची झोप खराब होते. नियमित व्यायामाने चांगली झोप लागते हे वास्तव आहे.

 

४. तणावमुक्ती
तुमचे बाळ नीट झोपत आहे का, तुमचे बाळ निरोगी आहे का, तुमचे बाळ चांगले खात आहे का आणि इतर अनेक गोष्टी आहेत, ज्यामुळे तुम्ही सतत तणाव आणि काळजी करता. पण एक तासाचा नियमित व्यायाम तुम्हाला हा तणाव जास्त चांगल्या प्रकारे नियंत्रित करण्यात मदत करू शकतो. (Postpartum Workout)

 

५. वजन कमी करणे
आणि सर्वांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे, तुम्ही नियमितपणे व्यायाम करत असाल, तर तुम्ही प्रेग्नंसी वजन कमी करू शकता, विशेषतः पोटाभोवती जमा झालेली चरबी.

 

फक्त आणि फक्त आरोग्याच्या (हेल्थ) बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही.
त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं. अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

Web Title :-  Postpartum Workout | alia bhatt resumes yoga classes after becoming mother know 5 benefits of postpartum workout

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Gauahar Khan | अभिनेत्री गौहर खानची चाहत्यांना गुडन्यूज; लवकरच होणार….

Amruta Fadnavis | ‘मी फक्त एकाच व्यक्तीला घाबरते, त्या म्हणजे…’ – अमृता फडणवीस

Neha Malik | नेहा मलिकचे हॉट फोटोशूट चांगलेच व्हायरल; नेहाचा बोल्ड अंदाज पाहून चाहते घायळ..