चेहरा सुंदर आणि उजळ करण्यासाठी ‘बटाटा’ अतिशय उपयुक्त !

पोलिसनामा ऑनलाईन टीम- त्वचेचा रंग उजळ करणारे नॅचरल ब्लीचिंग एजेंट्स बटाट्यात असतात. यामुळे चेहऱ्यावरील डाग दूर करण्यासाठी तसेच चेहऱ्याचा रंग उजळ करण्यासाठी बटाटे खूपच उपयुक्त ठरतात. बटाट्यामध्ये अँटी एजिंग प्रॉपर्टीज असल्याने रिंकल्स टाळण्यात मदत होते. याशिवाय बटाट्याचे आणखी बरेच फायदे आहेत.

एक बटाटा किसून घेवून त्यामध्ये चिमूटभर हळद पावडर मिसळून चेहऱ्यावर लावल्याने रंग गोरा होतो. एका बटाट्याचा रस आणि लिंबूचे काही थेंब मिक्स करुन चेहरा आणि हाता पायांवर दहा मिनिटे लावल्यास स्किनचा ग्लो वाढतो. एक बटाटा किसून घेऊन त्यामध्ये मुल्तानी माती आणि गुलाब जल मिसळून हे मिश्रण चेहऱ्यावर लावावे. चेहरा सुकल्यानंतर धुवून घ्यावा. बटाट्याचा हा उपाय केल्याने चेहरा उजळतो.

एका बटाट्याच्या स्लाइसवर काही थेंब पाणी टाकून चेहऱ्यावर पाच मिनिटे मसाज केल्याने डाग जातात. एका बटाट्याच्या रसामध्ये एका अंड्याचा पांढरा भाग मिसळून चेहरा आणि मानेवर लावावा. वीस मिनिटानंतर पाण्याने धुवून घ्यावे. या उपायामुळे रिंकल्सपासून बचाव होतो. एका बटाट्याच्या रसामध्ये कच्चे दूध मिसळून हे मिश्रण स्किनवर लावावे आणि वीस मिनिटानंतर धुवून घ्यावे. यामुळे सावळेपणा दूर होईल. एका बटाट्याचे स्लाइस करून त्या डोळ्यांखालील डार्क सर्कलवर पाच मिनिटे ठेवल्याने डार्क सर्कल दूर होतात. एका बटाट्याच्या रसामध्ये २ चमचे काकडीचा रस मिसळून चेहऱ्यावर लावावा. अर्ध्या तासानंतर चेहरा धुवून घ्यावा. यामुळे चेहऱ्याचा रंग उजळतो. एक बटाटा बारीक करुन घ्या. यामध्ये दही मिसळून चेहऱ्यावर लावल्याने चेहरा उजळतो.