अधिकार्‍यांचे दुर्लक्ष आणि ठेकेदारांच्या निष्काळजीपणामुळे राष्ट्रीय महामार्ग बनलाय मृत्युचा सापळा

मुरबाड : पोलीसनामा ऑनालईन (अरुण ठाकरे) – नॕशनल हायवेच्या कामा संदर्भात अनेक नागरिकांच्या तक्रारी येऊ लागल्या आहेत. या रस्त्याच्या काॕंक्रीटीकरणाचे काम गेल्या आठ महिन्यांपासून सुरू आहे.परंतु हे कामही निकृष्ठ दर्जाचे आहे. झालेल्या या काँक्रीटच्या रस्त्याला मोठ मोठया भेगा पडल्या असून अधिकार्यांचा दुर्लक्षीतपणा व ठेकेदाराच्या अनागोंदी कामामुळे प्रवासी व स्थानिक नागरिकांना या रस्त्यावरील पडलेल्या खड्ड्यांमुळे प्रचंड ञास सहन करावा लागत आहे. हे काम महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ यांच्या अधिपत्याखाली चालू असून पी.एस. के. इन्फ्रास्ट्रक्चर प्रो.प्रा.लि.हैद्राबाद कंपनीस या कामाचे कञांट दिले गेले आहे.

मार्च २०१८ मध्ये निविदा मंजूर झाली असून गेल्या आठ महिन्यांपासून हे काम अतिशय संथ गतीने सुरू आहे चूकीच्या पद्धतीने केलेले खोदकाम, एका बाजूला केलेला मातीचा भराव, जास्त लांबी पर्यंत दोन्ही बाजुला खोदलेला रस्ता यामुळे या रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य तयार झाले आहे. वाहन चालकास तारेवरची कसरत करावी लागत आहे व लहान – मोठ्या अपघातांची मालिका सूरुच आहे. या विरोधात जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते रमेश हिंदूराव, अॕड. रत्नाकर आलम, कचरू म्हारसे, विष्णू चौधरी व अन्य नागरिक यांनी दिनांक १६/०७/२०१९ पासून उपोषणास बसण्याचे निवेदन महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री ,सार्वजनिक बांधकाम मंत्री ,व सर्व विभागाला दिले आहेत.

रस्त्यावर पडलेले खड्डे त्वरीत भरावेत, निकृष्ट कामाची चौकशी व्हावी, रस्त्यावर अपघात झाल्यास बांधकाम कंपनी व अधिकारी यांच्यावर गुन्हे दाखल करावेत, रस्त्यासाठी जमीन जाणाऱ्या शेतकऱ्यांना योग्य मोबदला मिळावा व या रस्त्याचे काम जलद गतीने व्हावे या प्रमुख मागण्या त्यांनी निवेदनात केलेल्या आहेत. या आंदोलनात सर्व नागरिकांनी सहभागी व्हावे असे आवाहन रमेश हिंदूराव यांनी केले आहे.

आरोग्यविषयक वृत्त

दात पांढरेशुभ्र हवे असतील तर लिंबाचा असा करा उपयोग

पावसाळ्यात आलू बुखार आवश्य खा, यात आहेत भरपूर ‘व्हिटामिन्स’

अपचनाची समस्या अशी दूर करा, हे आहेत प्रभावी ६ घरगुती उपाय

डोकेदुखीने त्रस्त आहात का ? हे घरगुती रामबाण उपाय करा

‘मक्याचं’ कणीस खाल्यावर लगेच पाणी पिणे पडेल ‘महागात’

‘या’ ५ कारणांमुळे होते ‘किडनी’ खराब, जाणून घ्या

Loading...
You might also like