Coronavirus : ‘कोराना’मुळे कुक्कुटपालन व्यवसायचा 10 कोटींचा चुराडा, नव्या व्यावसायिकांवर ‘आर्थिक’ संकट

पोलीसनामा ऑनलाईन टीम – चिकन आणि कोंबडीच्या मांसामधून कोरोना वायरस पसरत असल्याची अफवा सोशल मीडियातून पसरल्याने कुक्कुट पालन व्यवसायाला जवळपास 10 कोटींचा फटका बसल्याचा अंदाज आहे. मागील काही दिवसांपुर्वी 100 रुपये खर्च करून वाढवलेली कोंबडी 10 रुपयांना विकण्याची वेळ व्यवसायिकांवर आली आहे. त्यामुळे कुक्कटपालन व्यवसाय अफवेचा आर्थिक बळी ठरला आहे. जवळपास दहा लाख कोंबड्या बेभावाने विक्री होत असल्याने या व्यवसायात नव्याने उभे राहिलेल्या व्यावसायिकांवर मोठे आर्थिक संकट कोसळले आहे.

कोरोना विषाणुच्या अफवेमुळे कोंबडीचा भाव थेट पाच ते दहा रुपयांवर आला आहे. त्यामुळे कुक्कटपालन व्यवसायिक हतबल झाले आहेत. बाजारात भाव नसल्याने या कोंबड्या पोसायच्या कशा आणि त्यांना खाद्य पुरवण्यासाठी पैसे आणायचे कोठून ? अशी नवी समस्या उभी राहिली आहे. लाखोंचे कर्ज काढून कुक्कुटपालन सुरू केले आणि कोंबड्या विकायची वेळ येताच कोरोनाने गाठले आहे. त्यामुळे अनेकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. बीड तालुक्यातील नाळवंडी येथील गणेश बळिराम राऊत यांचा तीन वर्षांपासून कुक्कुटपालनाचा व्यवसाय आहे.

सध्या त्यांच्याकडे लहानमोठ्या 6 हजार कोंबड्या असून त्यावर 7 लाखांपेक्षा अधिक खर्च झाला आहे. आता 10 रुपये किलोने कोंबडी विक्री करण्याची वेळ आल्याने नवेच आर्थिक संकट उभे राहिले आहे. जिल्ह्यात जवळपास 10 लाख कोंबड्यांचे उत्पादन आहे. मात्र कोरोनाच्या अफवेने बाजारात कोंबडीला मागणी नसल्याने अनेक ठिकाणी फुकटात कोंबड्या देण्याची वेळ आली आहे. या अफवेने कुक्कुटपालन व्यवसायाला जवळपास 10 कोटींचा फटका बसल्याचा प्राथमिक अंदाज असून नव्याने व्यवसायात उतरलेले तरुण तर अफवेचे व्यावसायिक बळीच ठरले आहेत. कोरोना विषाणुचा संसर्ग कोणत्याही प्राण्यांच्या मांसातून होत नाही. भारतीय लोक मांस खाताना व्यवस्थित शिजवून खात असल्याने ते पूर्णपणे सुरक्षित असते. त्यामुळे अफवांवर विश्वास ठेवू नये आणि