Power Crisis In India | देशात वीजेच्या संकटाचा धोका ! 72 थर्मल पावर प्लांटमधील कोळसा संपला, जाणून घ्या कारण

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Power Crisis In India | भारतात कोळशाचे गंभीर संकट सुरू आहे. या कारणामुळे अनेक पावर प्लांटमध्ये वीजेचे उत्पादन बंद होण्याची शक्यता (Power Crisis In India) आहे. यानंतर कोळसा उत्खनन कंपनी कोल इंडिया लिमिटेड (coal india limited) निशाण्यावर आली आहे. केंद्र सरकारने (central government) कोल इंडियाला म्हटले की, वीज बनवणार्‍या संयंत्रात कोळशाचा नियमित पुरवठा केला जावा. केंद्रीय एजन्सी सेंट्रल इलेक्ट्रिसी अथॉरिटीनुसार (central electricity authority) भारतातील 72 थर्मल पावर प्लांटमध्ये 8817 मेगावॉट वीजेचे उत्पादन बंद पडले आहे. वीजेची मागणी सातत्याने वाढत आहे. या कारणामुळे पावर एक्सचेंजमध्ये 10 हजार मेगावॉट वीजचे ट्रेडिंग 20 रुपये प्रति युनिट सुरू आहे.

स्थितीमध्ये सुधारणा नाही
कोळसा सचिव अनिल जैन (coal secretary anil kumar jain) यांनी कंपनीचे चेयरमन प्रमोद अग्रवाल (coal india chairman pramod agarwal) यांना 27 सप्टेंबरला एक पत्र लिहिले होते. यामध्ये म्हटले होते की, पावर प्लांटमध्ये कोळशाचा स्टॉक सतत कमी होत आहे. अनेकदा सांगूनही स्थितीत सुधारणा करण्यात आलेली नाही. याबाबत मंत्री स्तरावर अनेक बैठका झाल्या आहेत. पावर प्लांटमधील कोळशाची समस्या दूर करण्याबाबत अनेक सूचना देण्यात आल्या. ज्यावर आतापर्यंत अंमलबजावणी करण्यात आलेली नाही.

 

वीजेची मागणी वाढली

देशात सातत्याने वीजेची मागणी वाढत आहे. जूननंतर वीजेची मागणी 200 गीगावॉटच्या पुढे गेली आहे.
तर कोल इंडिया लिमिटेडकडून कोळशाचे प्रॉडक्शन आणि डिलिव्हरी सतत कमी होत आहे.
देशातील सर्व पावर प्लांटमध्ये कोळशाची टंचाई समोर आली आहे. ऑगस्टमध्ये वृत्त होते की,
57 पावर प्लांट कोळशाच्या टंचाईचा सामना करत आहेत. यामध्ये पाच पावर प्लांटमध्ये कोळशाचा स्टॉक आहे.
ते वीज बनवण्यासाठी कोळशाची प्रत्येक दिवसाच्या पुरवठ्यावर अवलंबून आहे.
तर सहा पावर प्लांटमध्ये एक दिवसाचा बफर स्टॉक आहे. (Power Crisis In India)

Web Title :- Power Crisis In India | threat of power crisis in india coal being exhausted in 72 power plants know the reason

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Multibagger Stocks | आश्चर्यकारक शेयर ! 1 लाख रुपयांचे केले 40 लाख रुपये, जाणून घ्या सविस्तर

Pune News | ‘अर्थचक्रा’साठी बँक कर्मचाऱ्यांचे योगदान महत्वाचे : केंद्रीय मंत्री डॉ. भागवत कराड

NCB Raid | जहाजावर ‘रेव्ह पार्टी’ ! शाहरुख खानच्या मुलाची एनसीबीकडून चौकशी; जाणून घ्या नेमकं काय झालंय