Power of Investing | लवकर करोडपती बनायचंय?, गुंतवणुकीच्या या तीन सवयी फॉलो केल्याने पूर्ण होईल स्वप्न

नवी दिल्ली : Power of Investing | गुंतवणूक (Investment) ही नेहमीच भविष्य सुरक्षित करण्याची किल्ली मानली जाते. गुंतवणुकीच्या मदतीने कोणत्याही चिंतेशिवाय आर्थिकदृष्ट्या संपन्न जीवन जगू शकता. तज्ज्ञ सांगतात की, जितक्या लवकर बचत सुरू कराल तेवढे चांगले असते. यासाठी नोकरी मिळताच पैशांची बचत सुरु करावी (Power of Investing).

लवकर गुंतवणूक सुरू करा
जर कमावत असाल तर गुंतवणुकीसाठी योग्य वयाची वाट पाहू नका. नोकरी लागताच बचत सुरू करा. उदाहरणार्थ, दरमहा १०,००० रुपये गुंतवायला सुरुवात केली असेल, ज्यावर १२ टक्के रिटर्न मिळत असेल, जर वयाच्या २५ व्या वर्षी ही गुंतवणूक सुरू केली तर ६० व्या वर्षापर्यंत तुमची गुंतवणूक ६,४३,०९,५९५ रुपये होईल.

पोर्टफोलिओमध्ये विविधता ठेवा
गुंतवणुकीच्या कोणत्याही एका साधनावर पूर्णपणे अवलंबून राहू नका. गुंतवणूक पोर्टफोलिओमध्ये (Portfolio) नेहमी विविधता ठेवा. उदाहरणार्थ, तरुण गुंतवणूकदार असाल, तर पूर्णपणे इक्विटीमध्ये गुंतवणूक करू नका. डेट आणि गोल्ड इत्यादीमध्ये गुंतवणूक करा.

गुंतवणूक चक्र समजून घ्या
कोणताही अ‍ॅसेट क्लास सतत रिटर्न देत नाही. कधी शेअर बाजारात रिटर्न चांगला मिळतो,
तर कधी व्याजदर वाढल्याने बँक एफडी देखील चांगला रिटर्न देते. तर कधी रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूकदारांना चांगली
संधी मिळते. यासाठी गुंतवणूकदारांनी नेहमी गुंतवणूक चक्र समजून घेतले पाहिजे. यासाठी आर्थिक सल्लागाराचा सल्ला घेऊ शकता.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Maharashtra Crime News | खळबळजनक! पोलीस पत्नीसह दीड वर्षाच्या चिमुकलीची हत्या करुन पतीनेही संपवले जीवन

Personal Loan Interest Rates | पर्सनल लोन घेण्याचा विचार करताय, या बँका देत आहेत सर्वात कमी व्याजावर कर्ज

Tomato Price Update | नेपाळचे टोमॅटो आल्याने खाली आला भाव, किरकोळ बाजारात इतके रुपये किलो झाली किंमत