महापारेषणची वीजवाहिनी तुटल्याने बाणेर, बालेवाडी, औंधमधील वीजपुरवठा विस्कळीत

पुणे : पाेलीसनामा ऑनलाईन

महापारेषण कंपनीची 132 केव्ही क्षमतेची रहाटणी वीजवाहिनी तुटल्याने मंगळवारी (दि. 28) सकाळी सव्वानऊच्या सुमारास बाणेर, बालेवाडी, पाषाण, औंध, सुस रोड, बावधन परिसरात विस्कळीत झालेला वीजपुरवठा महावितरणने 68 ते 70 मेगावॉट विजेचे यशस्वी भार व्यवस्थापन करून टप्प्याटप्प्याने दीड वाजेपर्यंत पूर्ववत केला.
[amazon_link asins=’B0734VLDTC’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’25e574cc-aabf-11e8-8c00-57c04b9a2f1a’]

याबाबत माहिती अशी, की महापारेषण कंपनीच्या एनसीएल 132 केव्ही उपकेंद्राला रहाटणी 132 केव्ही वाहिनीद्वारे वीजपुरवठा होतो. ही वाहिनी आज सकाळी सवा नऊच्या सुमारास रहाटणी येथे तुटल्याने एनसीएल उपकेंद्राचा वीजपुरवठा बंद पडला. परिणामी महावितरणच्या 11 केव्हीच्या 12 आणि 22 केव्हीच्या 9 अशा एकूण 21 वीजवाहिन्यांचा सुद्धा वीजपुरवठा खंडित झाला. त्यामुळे सांगवी, औंध, बाणेर, बालेवाडी, पाषाण, सुस रोड, शिवाजी हौसींग सोसायटी, बावधन आदी परिसरातील वीजपुरवठा बंद झाला होता.

कमकुवत पोलिसांना पुणे शहर, ग्रामीणच्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची दमबाजी 

महावितरणकडून तातडीने पर्यायी व्यवस्थेतून वीजपुरवठा सुरु करण्याचे प्रयत्न सुरु झाले. यामध्ये महापारेषणच्या कोथरूड, हिंजवडी, गणेशखिंड या उपकेंद्रातून पर्यायी वीजपुरवठ्याची व्यवस्था करण्यात आली. सकाळी 11.30 ते 12 वाजेपर्यंत महावितरणने 68 ते 70 मेगावॉट विजेचे यशस्वी भारव्यवस्थापन करून बाणेर, बालेवाडी, सांगवी, औंध, पॅन कार्ड रोड, शिवाजी हौसींग सोसायटी, बावधन या परिसरातील वीजपुरवठा सुरळीत केला. त्यानंतर दुपारी दीडच्या सुमारास पाषाण, सुस रोड, पाषाण-बाणेर लिंक रोडचा वीजपुरवठा सुरु करण्यात आला.
[amazon_link asins=’B00KNN4N4I’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’5990afdb-aabf-11e8-985a-e3a28fa28ed2′]

दरम्यान महापारेषणकडून रहाटणी येथे वीजवाहिनीच्या दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरु करण्यात आले व ते पूर्ण झाल्यानंतर दुपारी 2.55 वाजता एनसीएल 132 उपकेंद्गाला रहाटणी वाहिनीद्वारे होणार वीजपुरवठा सुरु झाला. त्यानंतर दुपारी तीनच्या सुमारास या उपकेंद्रातून महावितरणच्या सर्वच 21 वीजवाहिन्यांचा वीजपुरवठा पूर्ववत झाला.

लोकसभा-विधानसभा निवडणूक एकत्र : शरद पवार