×
Homeताज्या बातम्याPPF Account | पीएफ अकाऊंट झालं असेल मॅच्युअर तर 'या' 3 ...

PPF Account | पीएफ अकाऊंट झालं असेल मॅच्युअर तर ‘या’ 3 ऑप्शनद्वारे काढू शकता पैसे, मिळत राहिल फायदा; जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  सरकारकडून पब्लिक प्रॉव्हिडेंट फंडवर (PPF Account) सध्या 7.1 टक्के वार्षिक व्याज मिळते. तर पब्लिक प्रॉव्हिडेंट फंडचा मॅच्युरिटी पीरियड 15 वर्ष आहे. जर तुमचा सुद्धा पब्लिक प्रॉव्हिडेंट फंड मॅच्युअर होणार (PPF Account) असेल तर तुम्ही 3 पर्यायाद्वारे यामध्ये पडलेल्या फंडचा वापर करू शकता.

 

अकाऊंट बंद करून काढू शकता पैसे –

 

पब्लिक प्रॉव्हिडेंट फंडमध्ये (provident fund account) मॅच्युरिटीचा कालावधी 15 वर्षांचा असतो.
ज्यामध्ये मिळणारा पूर्ण रिटर्न टॅक्स फ्री असतो आणि ही अमाऊंट तुम्ही थेट तुमच्या खात्यात जमा करू शकता.

 

जर तुमच्या पब्लिक प्रॉव्हिडेंट फंडचा मॅच्युरिटी पीरियड पूर्ण झाला (PPF Account) असेल तर तुम्ही बँक किंवा पोस्ट ऑफिसमध्ये जिथे तुमचे पब्लिक प्रॉव्हिडेंट फंड अकाउंट आहे
तिथे एक फॉर्म भरून पूर्ण पैसे आपल्या बँक अकाऊंटमध्ये ट्रान्सफर करू शकता.

 

PPF फंड 5 वर्षासाठी पुढे वाढवू शकता –

 

जर मॅच्युरिटीनंतर पैशांची गरज नसेल तर तुम्ही पीपीएफ फंड 5 वर्षांसाठी पुढे इन्व्हेस्ट करू शकता.
यासाठी मॅच्युरिटीपासून एक वर्ष अगोदर फॉर्म जमा करावा लागेल. यासोबतच 5 वर्षात तुम्ही गरज भासल्यास पैसे काढू शकता.

 

अकाऊंट वाढवा, गुंतवणूक नाही –

 

PPF Account मॅच्युअर झाल्यानंतर डिअ‍ॅक्टिव्हेट होत नाही. म्हणजे अकाऊंट अ‍ॅक्टिव्ह राहिल आणि त्यावर कोणतीही पेनल्टी लागणार नाही.
जर तुम्हाला पैसे काढायचे नसतील किंवा नवीन गुंतवणुक (PPF investment) सुद्धा करायची नसेल तर PPF अकाऊंट मॅच्युरिटीनंतर 5 वर्षांसाठी वाढवू शकता.
यासाठी इन्व्हेस्टमेंटची आवश्यकता नाही. सोबतच कोणत्याही पेपरवर्कची गरज नाही. पुढील पाच वर्षापर्यंत तुमच्या अमाऊंटवरच व्याज मिळत राहिल.

 

Web Title : PPF Account | ppf account matured so you withdraw money from these 3 options continue to get benefits

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Green Peas Health Benefits | हिरवी मटर हिवाळ्यातील सुपरफूड ! प्रोटीनचे भांडार, हृदयाच्या आरोग्यासाठी सुद्धा चांगले

Vijay Hazare Trophy | ‘या’ खेळाडूची दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी होणार निवड; ‘तो’ विराट कोहलीचा आहे फेवरेट

Ahmednagar Crime | सासरा सुनेवर घ्यायचा भलताच संशय, सुनेनं भररस्त्यात केलं भयानक कृत्य; नगर जिल्ह्यात प्रचंड खळबळ 

Stay Connected
534,500FansLike
125,687FollowersFollow
61,453SubscribersSubscribe
Must Read
Related News