PPF Account Rules | पीपीएफ खाते मॅच्युअर झाल्यानंतर कोणते पर्याय असतात? येथे जाणून घ्या सविस्तर
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – PPF Account Rules | जर तुम्ही दीर्घ मुदतीसाठी गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल. तर पब्लिक प्रॉव्हिडंट फंडात Public Provident Fund (PPF) गुंतवणूक करणे हा एक उत्तम पर्याय आहे. या तिमाहीसाठी PPF वर वार्षिक 7.1% व्याजदर आहे. या गुंतवणुकीच्या पर्यायातील योगदान प्राप्तीकर कायद्याच्या कलम 80C अंतर्गत करमुक्त आहे. (PPF Account Rules)
जेव्हा तुमच्या PPF गुंतवणुकीचा लॉकइन कालावधी संपतो. तेव्हा आता काय करायचे असा प्रश्न पडतो. तुम्ही पैसे काढू शकता किंवा ठेवू शकता. अशावेळी अनेक पर्याय आहेत. त्यापैकी कोणते पर्याय फायदेशीर आहेत ते जाणून घेऊया.
बंद करू शकता
पहिला पर्याय म्हणजे तुम्ही खाते बंद करू शकता. मॅच्युरिटीची रक्कम बचत खात्यात ठेवता येते. पीपीएफ ठेवीवर कर आकारला जात नाही. (PPF Account Rules)
5 वर्षांसाठी वाढवू शकता
15 वर्षे पूर्ण झाल्यावर ती 5 वर्षांसाठी वाढवता येऊ शकते. तुम्हाला पाच वर्षांत दर महिन्याला पैसे जमा करावे लागणार नाहीत. रक्कम 5 वर्षांसाठी लॉक इन केली जाईल. त्यावर सध्याच्या दराने व्याज दिले जाईल.
किमान योगदानासह सुरू ठेवा
वाढीव कालावधी दरम्यान किमान योगदान चालू ठेवता येईल. हे पैसे काढण्याच्या मर्यादेशी संबंधित निर्बंधांसह येते. उदाहरणार्थ, तुमच्या पीपीएफ खात्याच्या विस्ताराच्या 5 वर्षांमध्ये, तुम्ही सुरुवातीला कमावलेल्या रकमेपैकी फक्त 60 टक्के रक्कम काढू शकता. तसेच, दरवर्षी फक्त एकदा पैसे काढण्याची परवानगी आहे.
पीपीएफ वर कर्ज (Loan On PPF Account)
पीपीएफवर कर्जाची सुविधा उपलब्ध आहे. खाते उघडण्याच्या तारखेपासून तीन ते सहा वर्षांच्या दरम्यान कर्ज घेता येते.
तुम्ही मागील आर्थिक वर्षाच्या शेवटी खात्यातील रकमेच्या 25% कर्ज घेऊ शकता.
कर्ज घेताना पीपीएफचा व्याजदर किती असेल. त्यापेक्षा 1% जास्त व्याज, कर्जाचे पैसे परत करावे लागतील.
कर्जाची रक्कम जाहीर झाल्यानंतर व्याजदरही निश्चित केला जातो.
Web Title :- PPF Account Rules | ppf account rules what are the otions on maturity of ppf account know full details here
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
PM Kisan बाबत मोठी बातमी, वाढवण्यात आली ‘या’ कामाची अंतिम तारीख
Pune Minor Girl Rape Case | बहिणीच्या मित्राकडून अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार