Uncategorizedताज्या बातम्यामहत्वाच्या बातम्या

PPF Alert | पीपीएफ खात्यासाठी बदलले नियम, वाचा ‘ही’ महत्वाची माहिती अन्यथा अकाऊंट होईल बंद

नवी दिल्ली : PPF Alert | तुम्ही 12 डिसेंबर 2019 रोजी किंवा त्यानंतर दोन किंवा अधिक सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी Public Provident Fund (PPF) खाती उघडली असल्यास, ती आता कोणत्याही व्याजाच्या भरणाशिवाय बंद केली जातील. तसेच, अशा पीपीएफ खात्यांचे विलीनीकरण होण्याची शक्यता नाही. (PPF Alert)

 

काय आहे नियम?

वास्तविक, सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी किंवा पीपीएफ नियम 2019 नुसार, गुंतवणूकदाराच्या नावावर एकापेक्षा जास्त पीपीएफ खाते (PPF Account) असू शकत नाही. जर कमावणार्‍या व्यक्तीने 12 डिसेंबर 2019 रोजी किंवा त्यानंतर एकापेक्षा जास्त पीपीएफ खाते उघडली असतील तर ते आता या नियमानुसार बंद केले जाईल.

 

सर्क्सुलरमध्ये सांगण्यात आले आहे की, जर पीपीएफ खाते कुणी 12.12.2019 रोजी किंवा त्यानंतर उघडले असेल तर, असे खाते कोणत्याही व्याजाविना बंद केले जाईल. अशा पीपीएफ खात्यांचे पेमेंट आणि विलीनीकरणाचा कोणताही प्रस्ताव पोस्ट संचालनालयाकडे पाठवला जाणार नाही. (PPF Alert)

 

उदाहरणाने समजून घ्या

समजा, जर एखाद्या व्यक्तीने जानेवारी 2015 मध्ये एक पीपीएफ खाते आणि जानेवारी 2020 मध्ये दुसरे PPF खाते उघडले असेल, तर ही खाती विलीन करता येणार नाहीत. जानेवारी 2020 मध्ये उघडलेले खाते कोणत्याही व्याजाविना बंद केले जाईल.

 

दुसर्‍या प्रकरणात, जर एक खाते 2015 मध्ये आणि दुसरे खाते 2018 मध्ये त्याच व्यक्तीने उघडले असेल,
तर ही खाती एकत्रीकरणाची विनंती करून विलीन केली जाऊ शकतात.

 

Web Title :- PPF Alert | ppf alert ppf accounts merger cannot be done in this case check new rule

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Back to top button