PPF And Mutual Fund | कोणत्या गुंतवणूकीमुळे तुम्ही लगेच व्हाल कोट्यधीश ?; फायदे-तोटे काय ? जाणून घ्या

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – PPF And Mutual Fund | भविष्याचा विचार करता अनेकजण गुंतवणूकीला (Investment) अधिक प्राधान्य देत असतात. चांगला परतावा आणि सुरक्षित गुंतवणूक याकडे अनेकांचा कल असतो. सध्याच्या धावपळीच्या युगात किमान गुंतवणूक आणि अधिक लाभ याकडे सर्वजण लक्ष देत असतात. या दरम्यान PPF आणि Mutual Fund हे पर्याय प्राधान्यस्थानी असतात. परंतु, या दोन्हीमध्ये (PPF And Mutual Fund) देखील काही तोटे आणि फायदे असतात. याबाबत सविस्तर जाणून घ्या.

 

1. पीपीएफ (Public Provident Fund) –

पीपीएफ ही योजना जी भविष्यातील बचतीसाठी फायद्याची ठरते. त्याचबरोबर यामुळे करही वाचवता येतो. पीपीएफमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांना डिपॉझिट रकमेवर व्याज मिळतो. जो करमुक्त असतो. (PPF And Mutual Fund)

 

फायदा काय ?

सरकारची विश्वासार्हता

सेक्शन 80 C अंतर्गत करमुक्त सवलत

500 रुपयांपासून बचतीची सुरुवात

व्याजावर निर्धारित मिळकत

 

जर तुम्हाला दरमहा दहा हजार रुपये गुंतवून कोट्यधीश व्हायचे आहे. तर, सध्या पीपीएफवर 7.1 टक्के व्याजदर मिळत आहे. पीपीएफचा परतावा देखील वाढत आणि कमी होत असतो. तरीही सरासरी व्याजदर मात्र 7.5 टक्के इतकाच असतो. दरम्यान एका अंदाजानुसार तुम्हाला कोट्यधीश व्हायला 27 वर्षे लागतील.

 

2. म्युचुअल फंड (Mutual Fund) –

या योजनेमध्ये गुंतवणुकदार त्याचे पैसे गुंतवतो ज्याची गणिते काही निष्णात मंडळी करतात. अमुक एका योजनेतील सर्व गुंतवणुकदारांचे पैसे ही मंडळी त्यांच्या अनुषंगाने वेगवेगळ्या ठिकाणी पुन्हा गुंतवत असतात.

 

फायदा काय ?

तुमचे पैसे जाणकारांच्या हाती असतात.

एसआयपीसोबतच आणखीही बरेच पर्याय

अगदी तुटपुंज्या रकमेनं सुरुवात

 

दरम्यान, म्युचुअल फंडमध्ये तुम्हाला 10 ते 12 टक्के व्याजदर मिळतो. त्यामुळे तुम्ही प्रतिमहिना जर दहा हजार रुपयांची गुंतवणूक करता आणि 12 टक्के परतावा मिळतो, तर 20 ते 21 वर्षांत तुम्ही कोट्यधीश होऊ शकता. पीपीएफ आधी तुम्ही या योजनेतून श्रीमंत होऊ शकता. महत्वाचे म्हणजे या गुंतवणुकीसाठी तुम्हाला मोठ्या रकमेचीही आवश्यकता नसणार आहे.

 

Web Title :- PPF And Mutual Fund | ppf and sip mutual fund bond which one is best crorepati

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा