PPF Calculator | ‘या’ खास ट्रिकने पीपीएफमध्ये जमा करा पैसे ! व्हाल 1.5 कोटीचे मालक, जाणून घ्या कॅलक्युलेशन
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – PPF Calculator | पब्लिक प्रॉव्हिडंट फंड (PPF) हा गुंतवणुकीच्या लोकप्रिय पर्यायांपैकी एक आहे, ज्यामध्ये तुम्हाला चांगला रिटर्न मिळतो. त्यामुळे करही वाचतो. परंतु, इतके लोकप्रिय असूनही अनेक वेळा लोक त्याचा पुरेपूर फायदा घेऊ शकत नाहीत. अशा परिस्थितीत, पीपीएफवरील व्याजाचे (Interest on PPF Account) कसे कॅलक्युलेशन (PPF Calculator) होते आणि तुम्हाला जास्तीत जास्त व्याज कसे मिळू शकते हे जाणून घेतल्यास, तुमची रक्कम अनेक पटींनी वाढू शकते.
मागील वर्षीच कमी झाले पीपीएफ व्याजदर
30 मार्च 2020 रोजी सरकारने लहान बचत योजनांच्या व्याजदरात मोठी कपात केली होती. PPF वर 7.1% व्याजदर आहे. लहान बचत योजना आणि PPF वरील व्याजाचा प्रत्येक तिमाहीत आढावा घेतला जातो. या व्याजदरांचा महागाईच्या दरावर मोठा परिणाम होतो.
असा होईल 1.5 कोटीचा फंड
तुम्ही एका वर्षात PPF खात्यात जास्तीत जास्त 1.50 लाख रुपये गुंतवू शकता. समजा, पीपीएफ खात्यात दरमहा 12,500 रुपये गुंतवले. तर 15 वर्षांच्या मुदतीनंतर, पीपीएफ खाते 5-5 वर्षांच्या ब्लॉकमध्ये वाढवू शकता.
अशा स्थितीत, 30 वर्षानंतर, PPF खात्याचा संपूर्ण निधी 1.5 कोटी (1,54,50,911) पेक्षा जास्त असेल. यामध्ये तुमची गुंतवणूक 45 लाख असेल आणि व्याज उत्पन्न सुमारे 1.09 कोटी रुपये असेल. (PPF Calculator)
वयाच्या 25 व्या वर्षी सुरू करू शकता गुंतवणूक
या सरकारी योजनेत जितक्या लवकर गुंतवणूक सुरू कराल, तितका फायदा होईल. समजा तुमचे वय 25 वर्षे आहे आणि तुम्ही पीपीएफमध्ये वार्षिक 1.5 लाख रुपये गुंतवले, तर वयाच्या 55 व्या वर्षी म्हणजेच निवृत्तीच्या सुमारे 5 वर्षे आधी तुम्ही करोडपती होऊ शकता.
PPF वरील व्याजाचे कॅलक्युलेशन
पीपीएफवर दर महिन्याला व्याजाचे कॅलक्युलेशन होते.
परंतु ते आर्थिक वर्षाच्या शेवटी खात्यात जमा केले जाते.
म्हणजेच, दरमहा जे काही व्याज कमवाल ते 31 मार्च रोजी तुमच्या खात्यात टाकले जाईल.
पीपीएफ खात्यात पैसे कधी जमा करायचे याची कोणतीही निश्चित तारीख नाही.
तुम्ही पीपीएफमध्ये मासिक, त्रैमासिक, सहामाही आणि वार्षिक पैसे जमा करू शकता.
पीपीएफवर जास्त व्याज मिळवण्याची पद्धत
आता व्याज कसे मोजले जाते ते समजावून घेऊ.
पीपीएफवरील व्याज दर महिन्याच्या 1 ते 5 तारखेपर्यंत खात्यातील रकमेवर मोजले जाते.
म्हणजेच, जर तुम्ही पीपीएफ खात्यात कोणत्याही महिन्याच्या 5 तारखेपर्यंत पैसे ठेवले तर त्या पैशावर त्याच महिन्यात व्याज मिळेल.
परंतु जर तुम्ही 5 तारखेनंतर म्हणजेच 6 तारखेला पैसे जमा केले तर त्यावर व्याज मिळणार नाही.
जमा केलेली रक्कमेवर व्याज पुढील महिन्यात मिळेल.
पीपीएफ कॅलक्युलेशनचे सोपे उदाहरण
पीपीएफ कॅलक्युलेशन सोप्या उदाहरणाने समजून घेऊयात.
ज्याद्वारे तुम्हाला कळेल की तुम्ही योग्य वेळी पैसे गुंतवून अधिक व्याज कसे मिळवू शकता.
उदाहरण क्रमांक – 1
समजा तुम्ही 5 एप्रिल रोजी तुमच्या खात्यात 50,000 रुपये जमा केले, तर 31 मार्चपर्यंत तुमच्या खात्यात आधीपासूनच 10 लाख रुपये आहेत.
5 एप्रिल ते 30 एप्रिल पर्यंत, तुमच्या खात्यातील एकूण रक्कम 10,50,000 रुपये होती, जी किमान शिल्लक आहे.
तर त्यावर 7.1% दराने मासिक व्याज – (7.1%/12 X 1050000) = 6212 रुपये होईल.
उदाहरण क्रमांक – 2
समजा तुम्ही 50000 रुपये 5 एप्रिलपर्यंत जमा केले नाहीत आणि नंतर 6 एप्रिल रोजी जमा केले. तर 5 एप्रिल ते 30 एप्रिल पर्यंत तुमच्या खात्यातील किमान शिल्लक 10 लाख रुपये असेल. यावर 7.1% दराने मासिक व्याज किती होते?
(7.1%/12 X 10,00,000) = रु 5917
या युक्तीने जमा केले पैसे, तर मिळेल जास्त व्याज
गुंतवणुकीची रक्कम फक्त 50,000 असेल, परंतु ठेवीच्या पद्धतीमुळे व्याजात फरक पडला.
अशा स्थितीत, जर तुम्हाला तुमच्या पीपीएफमधील पैशांवर जास्तीत जास्त व्याज हवे असेल, तर ही युक्ती लक्षात ठेवा आणि महिन्याच्या 5 तारखेपर्यंत पैसे जमा करा म्हणजे तुम्हाला त्या महिन्याचे व्याज नक्कीच मिळेल.
पीपीएफवरील दीड लाखांची गुंतवणूक करमुक्त आहे.
त्यामुळे जर तुम्हाला ही करसवलत घ्यायची असेल, तर नवीन आर्थिक वर्ष सुरू होताच 1 एप्रिल ते 5 एप्रिलदरम्यान संपूर्ण 1.5 लाख रक्कम जमा करा.
तुम्ही हे करू शकत नसाल तर दर महिन्याच्या 5 तारखेपर्यंत पैसे जमा करा.
Web Title :- PPF Calculator | ppf calculator invest in ppf with this trick and you will earn more interest see calculation earn money idea AS
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
PAN Card धारकांनो लक्ष द्या ! 1000 रुपये वाचवण्याची मिळत आहे संधी, जाणून घ्या सविस्तर