PPF Calculator | ‘पीपीएफ’मध्ये गुंतवणुक करून बना ‘करोडपती’, अवलंबा ‘ही’ ट्रिक; होईल मोठा फायदा, जाणून घ्या
नवी दिल्ली : PPF Calculator | कोविड-19 च्या काळात लोकांना त्यांचे कष्टाचे पैसे सुरक्षित गुंतवणूक साधनांमध्ये (Safe Investment Instruments) गुंतवायचे आहेत. चांगल्या व्याजासह गॅरेंटेड रिटर्नसह इन्व्हेस्टमेंट ऑपशन पर्याय (Safe Investment Option with Guaranteed Return) येतो तेव्हा सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी Public Provident Fund (PPF) आठवतो. (PPF Calculator)
ही एक अल्पबचत योजना (Small Saving Scheme) आहे जी सरकारद्वारे समर्थित आहे. अनेक फायद्यांमुळे ही योजना खूप लोकप्रिय आहे.
किती मिळते व्याज (PPF Interest Rate)
सरकार अनेक लहान बचत योजनांचे व्याजदर (Small Saving Schemes Interest Rate) प्रत्येक तिमाहीपूर्वी निश्चित करते. PPF वर मिळणारे व्याज कोणत्याही तिमाहीच्या सुरुवातीपूर्वी घोषित केले जाते. मात्र, बहुतेक पोस्ट ऑफिस बचत योजनांवर अधिक व्याज मिळते.
सध्या, PPF वर 7.1 टक्के दराने व्याज उपलब्ध आहे. मात्र, तुम्ही येथे काही टिप्स फॉलो केल्यास, गुंतवणुकीवर जास्त रिटर्न मिळवू शकता. (PPF Calculator)
अवलंबा या टिप्स (PPF Account Tips)
पीपीएफ खात्याच्या नियमांनुसार (PPF Account Rules), पीपीएफ खात्यात जमा केलेल्या रकमेवरील व्याजाची गणना मासिक आधारावर केली जाते. PPF Account जमा केलेल्या रकमेवरील व्याजाची गणना 5 तारखेपासून महिन्याच्या शेवटच्या तारखेपर्यंत केली जाते.
अशा स्थितीत तुम्ही तुमच्या पीपीएफ खात्यात कोणत्याही महिन्याच्या 1 ते 5 तारखेदरम्यान पैसे जमा केल्यास तुम्हाला त्या महिन्याचे व्याजही मिळेल. गुंतवणूक तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, तुम्हाला या गोष्टीचा अधिकाधिक फायदा घ्यायचा असेल, तर 1 ते 5 एप्रिल दरम्यान संपूर्ण वर्षभर गुंतवणूक करा.
हे देखील लक्षात ठेवा
जर तुम्हाला पीपीएफ खात्यात पैसे टाकून जास्तीत जास्त रिटर्न मिळवायचा असेल, तर तुम्ही चेकने पेमेंट करण्याऐवजी इतर पेमेंट मोड वापरा. याचे कारण असे की तुम्ही चेकद्वारे पैसे भरल्यास, तुमचा चेक ज्या दिवशी क्लिअर होईल त्या दिवशी ठेवीची तारीख नोंदवली जाईल. जर धनादेश 5 तारखेनंतर क्लिअर झाला तर तुम्ही त्या महिन्याचे व्याज गमवाल.
लवकरच होऊ शकता करोडपती
पीपीएफ ही एक अशी योजना आहे, ज्याद्वारे तुम्ही गुंतवणूक करून करोडपती होऊ शकता. त्यामुळे तुमची निवृत्ती सुरक्षित होते. तुम्ही वर नमूद केलेल्या टिप्सचे पालन केल्यास, तुम्हाला अधिक व्याज मिळेल आणि तुमचे लक्षाधीश होण्याचे स्वप्न लवकरच पूर्ण होईल.
एकाच वेळी तीन फायदे
देशभरातील लोकांना ही योजना खूप आवडली आहे. याचे कारण हे आहे की, जास्त रिटर्न मिळतो, तुमची गुंतवणूक आणि रिटर्न पूर्णपणे करमुक्त आहे. तसेच या योजनेला ईईई – EEE (Exempt, Exempt, Exempt) दर्जा आहे.
Web Title :- PPF Calculator | use these tricks to become crorepati fast by investing public provident fund ppf news alert
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
- Navneet Rana | खा. नवनीत राणांचा दावा साफ खोटा, पोलिसांनी न्यायालयात केलं सिद्ध! (व्हिडिओ)
- LIC IPO Latest Update | ‘सेबी’कडे (SEBI) जमा झाला ड्राफ्ट, एलआयसीच्या पॉलिसीधारकांना मिळणार 3 कोटी पेक्षा जास्त शेअर; जाणून घ्या सविस्तर
- Pune Crime | खळबळजनक ! पुण्याच्या देहुगावात पत्नीनं साथीदारांच्या मदतीनं केली पतीची ‘गेम’, कारण जाणून बसेल धक्का