आर्थिकराष्ट्रीय

PPF मध्ये अशाप्रकारे दुप्पट करू शकता गुंतवणूक, टॅक्स बचतीसह मिळेल चांगला रिटर्न; जाणून घ्या सर्वकाही

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – PPF | पब्लिक प्रॉव्हिडंट फंड Public Provident Fund (PPF) हे गुंतवणुकीचे एक अतिशय विश्वासार्ह पर्याय आहे. यामध्ये केलेली गुंतवणूक 100% सुरक्षित आहे आणि रिटर्न देखील चांगला मिळतो. याशिवाय पब्लिक प्रॉव्हिडंट फंडातील गुंतवणुकीवर कर सवलत मिळते. एखादी व्यक्ती यामध्ये वार्षिक एक लाख 50 हजार रुपयांपर्यंत गुंतवणूक करू शकते. पण ही गुंतवणूक 3 लाख रुपयांपर्यंत करण्याची युक्ती आम्ही तुम्हाला येथे सांगणार आहोत. ज्यामध्ये तुम्हाला समान रिटर्न मिळेल, तसेच कर सवलतही मिळेल. (PPF)

 

पीपीएफमधील गुंतवणुक मर्यादा अशी करू शकता दुप्पट –
प्राप्तीकराच्या कलम 80 सी नुसार, PPF मध्ये, 1.50 लाख रुपयांपर्यंतच्या गुंतवणुकीवर प्राप्तीकर सूट उपलब्ध आहे. परंतु अनेक लोकांच्या बाबतीत असे घडते की त्यांची पीपीएफमधील गुंतवणुकीची मर्यादा संपुष्टात येते आणि त्यांचे उत्पन्न प्राप्तीकराच्या कक्षेत येऊ लागते.

अशा स्थितीत हे लोक गुंतवणुकीचे इतर पर्याय शोधू लागतात. दुसरीकडे, कर तज्ञांच्या मते, जर गुंतवणूकदार विवाहित असेल तर तो आपल्या पत्नी किंवा पतीच्या नावाने पीपीएफ खाते उघडू शकतो आणि त्यात स्वतंत्रपणे 1.5 लाख रुपये गुंतवू शकतो.

पीपीएफमध्ये गुंतवणुकीतून मिळतात अनेक फायदे –
लाईफ पार्टनरच्या नावाने पीपीएफ खाते उघडल्यास पीपीएफमधील गुंतवणुकीची मर्यादा नि:संशयपणे दुप्पट होईल. पण तरीही आयकर सवलत मर्यादा एक लाख पन्नास हजार रुपयेच राहणार आहे. त्याच वेळी, PPF गुंतवणूक ई-ई-ई श्रेणी अंतर्गत येत असल्याने, व्याज आणि मॅच्युरिटी रकमेवर निश्चितपणे कर सवलत मिळेल.

 

IRT मध्ये क्लबिंग तरतुदींचा परिणाम नाही –
प्राप्तीकर कलम 64 नुसार, पतीने पत्नीला दिलेल्या भेटवस्तू किंवा रकमेतून मिळणारे उत्पन्न पतीच्या उत्पन्नात जोडले जाते.
परंतु पीपीएफ गुंतवणूक ई-ई-ई श्रेणी अंतर्गत येत असल्याने ती पूर्णपणे करमुक्त आहे.
क्लबिंग तरतुदींचा येथे कोणताही परिणाम होत नाही.

 

Web Title :- PPF | double investment in ppf like this you get better returns with tax savings

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा


 

 

 

Back to top button