PPF खातेधारकांसाठी भारतीय पोस्ट देत आहे मोठी सुविधा, घरबसल्या करू शकता हे काम
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – PPF | तुम्ही जर इंडिया पोस्टचे पीपीएफ खातेधारक असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण, इंडिया पोस्टने ’पोस्ट ऑफिस सेव्हिंग बँक अकाऊंट’ (POSB) ई-बँकिंग प्लॅटफॉर्मवर PPF खाते उघडण्याची आणि बंद करण्याची सेवा लागू केली आहे. यासह, ई-बँकिंग सुविधेचा लाभ घेणारे पोस्ट ऑफिस ग्राहक त्यांचे पीपीएफ खाते ऑनलाइन उघडू आणि बंद करू शकतात.
इंडिया पोस्टकडून ट्विटरवर ही माहिती देताना सांगण्यात आले की अधिक माहितीसाठी – https://ebanking.indiapost.gov.in लिंक किंवा तुमच्या जवळच्या पोस्ट ऑफिसशी संपर्क साधा.
PPF खाते काय आहे :
PPF किंवा पब्लिक प्रॉव्हिडंट फंड ही भारतातील एक लोकप्रिय स्मॉल सेव्हिंग स्कीम आहे. तुम्ही या योजनेत फक्त 500 रुपयांपासून गुंतवणूक सुरू करू शकता. त्याच वेळी, ही टॅक्स सेव्हिंग स्कीम आहे. याशिवाय सरकारकडून 7.10 टक्के दराने व्याज दिले जाते.
कसे मोजले जाते व्याज :
PPF व्याजाची गणना मासिक आधारावर केली जाते परंतु चक्रवाढ व्याजाची गणना दरवर्षी केली जाते. गुंतवणूकदार एका आर्थिक वर्षात 1.5 लाख रुपये जमा करू शकतात. एखादी व्यक्ती फक्त एकच पीपीएफ खाते उघडू शकते आणि संयुक्त खात्याला परवानगी नाही. खाते उघडण्याच्या सातव्या वर्षापासून आंशिक पीपीएफ काढण्याची परवानगी आहे.
Web Title :- PPF | india post has implemented the service of opening and closing ppf account online detail here
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
High Court | पत्नीची देखभाल करणे कायदेशीर प्रकारे पतीची जबाबदारी, HC ने फेटाळली याचिका
EPFO | तुमच्या PF खात्यात किती पैसे टाकणार सरकार, जाणून घ्या हिशेब
Cyrus Mistry Death | टाटा समूहाचे माजी अध्यक्ष सायरस मिस्त्री यांचे अपघाती निधन