PPF Investment | … तर PPF खात्यात गुंतवणुकीशिवाय होईल मोठी कमाई, जाणून घ्या जबरदस्त फॉर्म्युला
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पीपीएफमधील गुंतवणूक (PPF Investment) ही सुरक्षित आणि फायदेशीर गुंतवणूक मानली जाते. दरम्यान, सरकार पीपीएफ गुंतवणुकीच्या (PPF Investment) सुरक्षेची हमी देते, यामुळेच ही अतिशय सुरक्षित गुंतवणूक मानली जाते. पीपीएफ खात्यामध्ये (PPF Account) पैसे जमा न करता देखील तुम्हाला याचा फायदा घेता येऊ शकतो, यावर तुमचा विश्वास बसणार नाही. मात्र, पीपीएफ खात्यात एक पर्याय असून यामध्ये गुंतवणूक न करताही व्याजाचा (Interest) लाभ घेता येऊ शकतो.
पीपीएफ अकाउंट काय आहे ?
पीपीएफ खाते पोस्ट ऑफिससह (Post Office) निवडक शाखांमध्ये 15 वर्षाच्या कालावधीसाठी उघडता येते. यामध्ये तुम्ही प्रत्येक वर्षी किमान 500 रुपये आणि जास्तित जास्त 1.5 लाख रुपये जमा करु शकता. खातेदाराला दीड लाखांपेक्षा जास्त रकमेवर व्याज मिळत नाही.
15 वर्षानंतर 2 पर्याय
15 वर्ष पूर्ण झाल्यानंतर तुम्ही पीपीएफ खात्यमधून पैसे काढू शकता. मात्र, यावेळी तुमच्याजवळ दोन पर्याय आहेत. पहिला म्हणजे पूर्वीप्रमाणेच गुंतवणूक करुन खाते 5-5 वर्षांसाठी वाढवू शकता. यासाठी तुम्हाला केवळ लेखी विनंती करावी लागणार आहे.
गुंतवणुकीशिवाय असे मिळेल व्याज
15 वर्षानंतर दुसरा पर्याय म्हणून तुम्ही पीपीएफ खाते गुंतवणुकीशिवाय (PPF Investment) ऑपरेट करू शकता. यामध्ये तुमच्या गुंतवणुकीसह 15 वर्षात जी रक्कम मॅच्युअर (Amount Mature) झाली आहे, त्या रक्कमेवर सरकारकडून प्रत्येकवर्षी निश्चित व्याज मिळत राहते. यामध्ये तुम्हाला कोणतीही रक्कम जमा करावी लागत नाही.
पीपीएफचे फायदे
– सध्या पीपीएफ खात्यात 7.1 टक्के दराने व्याज मिळते.
– पीपीएफ खात्यात जमा केलेल्या रक्कमेवर आयकर सवलत (Income Tax Relief) घेता येते.
– पीपीएफ खात्यातून मॅच्युरिटी वर मिळणारा पैसा करमुक्त (Tax Free) असतो.
– पीपीएफ खात्याचा लॉक-इन कालावधी 15 वर्षांचा असतो.
– पीपीएफ खात्यात जमा केलेल्या रकमेवर भारत सरकार (Government of India) हमी देते.
Web Title :- PPF Investment | public provident fund (ppf) savings idea without depositing money you can earn big interest know here calculation
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update