PPF, NSC, ‘सुकन्या समृध्दी’सह या स्कीममध्ये पैसे ठेवणार्‍यांसाठी मोठी बातमी, कमी होऊ शकतात दर

नवी दिल्ली : पोलीसनामा ऑनलाइन – जर आपण पोस्ट ऑफिसमध्ये पब्लिक प्राॅव्हिडंट फंड (PPF), सुकन्या समृद्धि, NSC, मुदत ठेव (FD) आणि आरडी (RD) खाते उघडले असेल तर ही बातमी आपल्यासाठी अत्यंत महत्वाची आहे. कारण रिझर्व्ह बॅंकेने सरकारला सूचविले की, जर लहान बचत योजनांवरील व्याज दर कमी केले तर बँकांना कर्ज स्वस्त करण्याचा मार्ग खुला होऊ शकतो. अर्थ मंत्रालय छोट्या बचत योजनांवरील व्याज दर ठरवते. दरम्यान, जून २०१९ मध्ये छोट्या बचत योजनांचे व्याज दर ०.१० टक्क्यांनी कमी करण्यात आले आहेत.

सध्या लहान बचत योजनांवरील व्याज दर –
(१) पब्लिक प्राॅव्हिडंट फंड (PPF): ७.९०%
(२) सुकन्या समृद्धि योजना : ८.४%
(३) पोस्ट ऑफिस टाईम डिपॉझिट ५ वर्षासाठी : ७. ७%
(४) राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र (NSC ) : ७.९%
(५) किसान विकास पत्र (KVP) : .७.६%
(६) ज्येष्ठ नागरिक बचत योजना : ८.६%

दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार गेल्या आठवड्यात झालेल्या एमपीसीच्या बैठकीनंतर आरबीआयने छोट्या बचत योजनांवरील व्याज दर कमी करण्याचा सल्ला दिला आहे. लहान बचत योजनांचे नवीन दर तीन महिन्यांनी लागू केले जातात. परंतु जुलैनंतर त्यांच्यात कोणताही बदल झालेला नाही. मागील तिमाहीत सरकारी बाँडवरील नफ्याच्या आधारे हे दिले जाते. गेल्या दोन तिमाहीत सरकारी बाँडवरील व्याज कमी झाले आहे.

– एमपीसीच्या बैठकीनंतर आरबीआयच्या अहवालात म्हटले की, रेपो रेटमधील कपातीचा सर्वसामान्यांना पूर्ण लाभ न मिळण्यामागील प्रमुख कारण म्हणजे लहान बचत योजनांवरील व्याज दर. त्यामुळे अल्प मुदतीच्या योजनांचे व्याज दर ०. ७० टक्क्यांवरून १.१० टक्क्यांपर्यंत कमी करता येऊ शकतात.

– तसेच या छोट्या बचत योजनांवर देय व्याजाची किंमत खूप जास्त आहे, ज्यामुळे त्यांच्या निधीची किंमत वाढते. त्यामुळे बँकांना स्वस्त कर्जे देता येत नाहीत. आरबीआयने फेब्रुवारी-ऑक्टोबर २०१९ मध्ये रेपो दरात १.३५ टक्क्यांनी कपात केली होती, तर बँकांकडील कर्जाचे दर फक्त ०.५० टक्क्यांनी कमी केले आहेत.

Visit : Policenama.com