PPF मध्ये पैसे गुंतवणारे मिळवू शकतात ‘या’ नियमाव्दारे अधिकचा ‘लाभ’, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आपण सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (PPF) मध्ये गुंतवणूक केली असेल तर त्यासंबंधी काही नियमांचा फायदा घेऊन आपण मोठ्या प्रमाणात बचत करू शकतो. पीपीएफ हा दीर्घकालीन गुंतवणूकीचा पर्याय आहे. पीपीएफ खात्याचा मॅच्युरिटी कालावधी १५ वर्षांसाठी असतो. यानंतर आपण ५-५ वर्षांच्या कालावधीसाठी मुदत वाढवू शकतो. पीपीएफ खात्याची मुदत १५ वर्षांनंतर वाढवण्यासाठी तुम्हाला मुदतपूर्तीच्या एक वर्ष आधी फॉर्म भरावा लागेल.

१५ वर्षाच्या मॅच्युरिटी अकाउंटवर आपल्याला नवीन पीपीएफ खाते उघडण्याची आवश्यकता नाही. मुदत वाढवण्याबरोबरच तुम्हाला अतिरिक्त लिक्विडिटीदेखील मिळेल, जी तुम्हाला नव्या पीपीएफ खात्यावर मिळेल. यावरसुद्धा तुम्हाला करमुक्त गुंतवणूकीचा पर्याय तसेच आजीवन काळापर्यंत पुरेशी तरलता मिळण्याचा पर्याय मिळेल. आयकर कायद्याच्या कलम ८०सी अंतर्गत तुम्हाला करात सूट मिळण्याची सुविधा मिळेल.

पीपीएफ मॅच्युरिटी कालावधी वाढविण्यासाठी नियम :
१) तुम्ही पीपीएफची मुदत १५ वर्षे पूर्ण झाल्यानंतरही वाढवू शकता. कालावधी जसजसा वाढत जाईल, तसतसे या खात्यात योगदान देण्याचे नियम देखील आपण मागील १५ वर्षासारखेच असतील. दरम्यान, कालावधी वाढविण्यासह आपल्याला एका गोष्टीची विशेष काळजी घ्यावी लागेल या कालावधीत आपण एका वर्षासाठी पीपीएफ खात्यात योगदान न दिल्यास विस्तारित कालावधीसाठी आपल्याला आणखी योगदान देण्याची संधी मिळणार नाही.

२) १५ वर्षाचा मॅच्युरिटी कालावधी वाढविण्यासाठी मॅच्युरिटी संपण्यापूर्वी एक वर्ष आधी ठरवावे लागेल. आपण हे करणे चुकल्यास या खात्याचा कालावधी पुढील ५ वर्षांसाठी स्वयंचलितपणे वाढविला जाईल. दरम्यान, या वेळी आपण या पीपीएफ खात्यात योगदान देऊ शकणार नाही.

३) लिक्विडीटीबद्दल बोलायचे झाले तर, नव्याने सबस्क्रिप्शन देऊन खाते चालू ठेवल्यास प्रत्येक कालावधीच्या सुरूवातीस खात्यात जमा झालेल्या एकूण रकमेपैकी ६० टक्के रक्कम काढू शकता. परंतु, गुंतवणूकदाराला हे लक्षात ठेवले पाहिजे की ते वर्षातून एकदाच हे पैसे काढू शकतात.

४) आपण या खात्याचा कालावधी वाढविल्यास, परंतु पुढे गुंतवणूक न केल्यास तुम्हालाही ही सुविधा मिळेल. अशा परिस्थितीत आपल्या खात्यावर पैसे काढण्याची मर्यादा नाही. तथापि, आपण वर्षातून फक्त एकदाच पैसे काढू शकता.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/