PPF मध्ये गुंतवणूक करणार्‍यांसाठी मोठी बातमी ! बदलले पैसे काढण्याचे नियम, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पब्लिक प्रोविडेंट फंड ( PPF ) यांच्यामध्ये जर तुम्ही आपल्या भविष्यासाठी गुंतवणूक केलेली असेल तर ही बातमी तुमच्यासाठी खूप महत्वाची आहे. कारण सरकारने याबाबतच्या नियमांमध्ये मोठा बदल केला आहे. नव्या नियमांमध्ये खाते बंद करण्यासंबंधीच्या नियमांमध्ये बदल करण्यात आला आहे. पीपीएफच्या खात्यामध्ये वर्षाला 1.5 लाख रुपयांपर्यंतच्या गुंतवणुकीवर कलम 80 C नुसार आयकरात सूट मिळते. करांचे बरेच फायदे पाहता लोक त्यांच्या बँक / पोस्ट ऑफिसमध्ये पीपीएफ खाते उघडतात. या मदतीने लोक भरपूर पैसे बचत करतात.

पीपीएफ खात्याचे बदलले नियम
पीपीएफ योजना 2019 मध्ये पीपीएफ खाते अकाली बंद होण्याचे नियम बदलले आहेत. यात अकाली बंदीचा तिसरा आधार सादर करण्यात आला आहे. नव्या नियमानुसार आता पीपीएफ खात्याला 5 आर्थिक वर्ष पूर्ण होण्याआधी बंद करता येणार नाही. जाणून घेऊयात सर्व नवीन नियम

या स्थिती मध्येच वेळेआधी बंद करू शकता PPF अकाऊंट
2016 मध्ये सरकारने पीपीएफ खात्याला वेळेआधी बंद करण्याची अनुमती दिलेली होती. 2019 मध्ये ही योजना बंद करण्याचा तिसरा आधार (कारण ) सांगण्यात आले. यामुळे आता खातेधारक आपल्या निवासस्थानामध्ये बदल झाल्यास आपले पीपीएफ खाते बंद करू शकतात. परंतु हे पीपीएफ खाते खोलल्यानंतरच्या पाच वर्षांनीच करणे शक्य आहे. यासाठी एक स्पेशल फॉर्म 5 बनवण्यात आला आहे.

यापूर्वी, खातेधारकाला , पति – पत्नी, मुले किंवा पालक यांना गंभीर आजारांमुळे पीपीएफ खाते अचानक बंद करण्यास सरकारने परवानगी दिलेली होती. यामध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. वेळे आधी खाते बंद करण्याचे आणखी एक कारण स्वतःच्या किंवा मुलांच्या शिक्षणासाठी पैशांची गरज असणे हे देखील आहे.

वेळे आधी बंद केल्याने 1 % व्याज कमी मिळणार
आधीप्रमाणे पीपीएफ योजना 2019 मधेही वेळे आधी खाते बंद केल्यास 1 % व्याज कमी मिळणार आहे.

संलग्न होणार नाही रक्कम
पीपीएफ खात्यात असलेली रक्कम कोणत्याही परिस्थितीत संलग्न केली जाऊ शकत नाही. नवीन नियमांनुसार, खातेदाराचे कोणतेही कर्ज किंवा उत्तरदायित्व वसूल करण्याच्या कोर्टाच्या आदेशानंतरही पीपीएफ खात्यात पडून असलेली रक्कम जप्त केली जाणार नाही.

PPF चे फायदे ?
पीपीएफला दरवर्षी किमान 500 रुपये गुंतवावे लागतात आणि आपण प्रत्येक आर्थिक वर्षात 1.50 लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक करू शकता. पीपीएफमध्ये आयकर कायद्याच्या कलम 80 सी अंतर्गत लागू असलेल्या मर्यादेच्या आधारे कर लाभ मिळतो. सर्वात चांगली गोष्ट म्हणजे इन्कम टॅक्स गुंतवणूकीची रक्कम, व्याज आणि मॅच्युरिटीच्या रकमेवर माफ केला जातो.

फॉर्म मध्ये बदल
खाते खोलण्याचा फॉर्म – फॉर्म A ऐवजी फॉर्म 1 झाला आहे.
योगदान फॉर्म- आधीचा फॉर्म B
आंशिक माघार – फॉर्म C ऐवजी फॉर्म 2
मैच्योरिटी नंतर खाते बंद होणार – फॉर्म C ऐवजी फॉर्म 3 झाला आहे.
PPF लोन- फॉर्म D ऐवजी फॉर्म 2 झाला आहे.
वेळेआधी समाप्ती – N/A ऐवजी फॉर्म 5 झाला आहे.
नॉमिनेशन- फॉर्म E ऐवजी फॉर्म 1

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/