‘PPF’ पासून पोस्टाच्या बचत योजनांच्या नियमात बदल, खातेदाराच्या ‘मृत्यूनंतर’ तात्काळ पैसे मिळणार
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – केंद्र सरकारने पब्लिक प्राॅव्हिडंट फंड, सिनियर सिटीजन सेव्हिंग स्कीम्स आणि पोस्ट ऑफिस बचत योजना यासंबंधित नियमात बदल केले आहेत. त्यामुळे या बचत योजनेत गुंतवणूक करणाऱ्यांना ही माहिती असणे आवश्यक आहे की, योजनांच्या नियमात नक्की काय बदल करण्यात आले आहे.
डेथ क्लेमला आता ‘हे’ आवश्यक नाही –
सरकारने विविध बचत योजनांच्या डेथ क्लेमला मंजूरी देणाऱ्या प्रक्रियेसंबंधित नियमात बदल केले आहे. ज्यात कोणतेही नोंदणीकृत नामांकन आणि कायदेशीर पुरावा नाही. मिनिस्ट्री ऑफ कम्युनिकेशनच्या अंतर्गत येणाऱ्या पोस्ट विभागाने विविध तारखांना दोन नियम जाहीर केले आहेत.
नियम होणार तात्काळ लागू –
सरकारकडून स्पष्ट करण्यात आले आहे की, नियम तात्काळ लागू होतील. हे नियम 29 ऑगस्ट 2019 पासून लागू होतील. खातेदाराच्या मृत्यूनंतर कोणत्याही कायदेशीर पुराव्याशिवाय क्लेम मंजूर करण्यात येईल. परंतू यासाठी सीमा निश्चित असतील. नव्या नियमांतर्गत चीफ पोस्ट मास्टर जनरल किंवा पोस्ट मास्टर जनरल 5 लाख रुपयांपर्यंतचे क्लेम मंजूर करेल.
मृत्यूच्या 6 महिन्यानंतर मिळेल क्लेमला मंजूरी –
नव्या नियमांनूसार वेगवेगळ्या अधिकाऱ्यांसाठी मंजूरीचा कालावधी निश्चित करण्यात आला आहे. त्यांच्याकडे अधिकार असेल की ते क्लेमची रक्कम मंजूर करतील. ही रक्कम गुंतवणूकदाराच्या मृत्यूच्या 6 महिन्यानंतर मिळेल. 20 मे 2019 च्या या नव्या नियामांनूसार पीओएसबी, सीबीएस मॅन्युअल, वॉल्यूम 1 आणि 2 मध्ये बदल करण्यात आले आहेत.
कोणता अधिकारी किती पर्यंतचा क्लेम मंजूर करु शकतो –
या निर्देशानंतर सर्व पोस्ट मास्टर 5 हजार रुपये, लोवल सेलेक्शन ग्रेडचा अधिकारी 10 हजार रुपये, डिप्टी पोस्टमास्टर 25 हजार रुपये, डिप्टी चीफ पोस्ट मास्टर 1 लाख रुपये, चीफ पोस्ट मास्टर इन जीपीओ 2.5 लाख रुपये, रिजनल डायरेक्टर 3.75 लाख रुपये आणि चीफ पोस्टमास्टर जनरल 5 लाख रुपयांपर्यंतचा क्लेम मंजूर करु शकतील.
काकडीचे ‘हे’ १५ अद्भूत आरोग्यवर्धक लाभ, जाणून घ्या
अंडर आर्म्सचे केस काढण्यासाठी ‘रेजर’ वापरत असाल तर ‘हे’ जरूर वाचा
‘या’ सोप्या ६ उपायांनी काही मिनिटांत दूर होईल कानदुखी, जाणून घ्या
कोथिंबीरचे ‘हे’ ९ फायदे, अशाप्रकारे करा वापर
कोरफड लाभदायक आहेच, पण होऊ शकतात ‘हे’ ७ दुष्परिणामही, जाणून घ्या
‘सेक्स’बाबत तुम्हालाही पडत असतील ‘हे’ 10 प्रश्न तर जाणून घ्या त्यांची उत्तरे
पन्नाशीनंतरही तरुण राहण्यासाठी स्त्री-पुरुषांनी करावीत ‘ही’ १६ कामे
दररोज ‘सेक्स’ केल्यास सुधारतो शुक्राणूंचा दर्जा, करा ‘हे’ ७ घरगुती उपाय
तुम्ही जर प्रेग्नेंट असाल तर ‘या’ ८ गोष्टींची विशेष काळजी घ्या